Posts

Showing posts from September, 2020

आठवणी २ - मु. पो. बारामती

Image
आठवणी १ - प्रस्तावना माझे बाबा पाटबंधारे खात्यात कामाला असल्याने त्यांची साधारण दर चार वर्षांनी बदली होत असे. पाटबंधारे खात्याची कामे सुरू असतील अशा ठिकाणी म्हणजेच बर्‍यापैकी लहान आणि अगदीच क्वचित शहरात बदली होत असे. आई बाबांचे लग्न झाल्यापासून आणि माझ्या जन्माच्या आधी भाळवणी, सातारा, करमाळा अशा ठिकाणी बदल्या झाल्या होत्या. बदली झाली की चंबूगबाळे आवरायचे अन् निघायचे. सामानाची बांधाबांध व्यवस्थित करता यावी म्हणून आईने त्या काळात मिळत असतील ती खोकी तसेच पॅकिंगसाठी म्हणून आमचे लहानपणीचे कपडे सांभाळून ठेवले होते. एवढी गावे फिरलो तरी कपाचा एक टवकासुध्दा निघाला नाही असं पॅकिंग असायचं. आमची अशी फिरस्ती सुरू होती  तोपर्यंत मी बरीच लहान होते त्यामुळे आवराआवरीत मदत केलेली मला तरी आठवत नाही. खरंतर आज पर्यंत मला वाटत होते की मला पूर्वीचे काहीच आठवत नाहीये. जणू आठवणींचे गाठोडे कुठेतरी सोडून आले आहे. पण आज आवर्जून बसले तर ते गाठोडे आणि त्यातल्या कित्येक आठवणी  सापडल्या आहेत. ह्या आठवणींचे तुकडे वेचता वेचता केवढा कोलाज तयार होतो ते बघायचं.   अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची तर सोलापूरपासून सुरु कराव

आठवणी १ - प्रस्तावना

Image
पूर्वी म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी मला आठवणीत रमणे जमायचेच नाही. असं वाटायचं की गेला तो काळ, आता काय रमायचं आहे त्यात! पण दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. वेगात धावणाऱ्या आयुष्याला जाणीवपूर्वक एक ब्रेक लावला. आणि ह्या लॉकडाऊनने तर आयुष्य अजूनच संथ झालं. घरातले सगळेच त्यामानाने निवांत असल्याने, बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशातच मिसळपाव ह्या मराठी साईटने गणेश लेख मालेअंतर्गत 'आठवणी' हा विषय दिला आणि मी आठवणींमध्ये कधी रमले ते कळलंच नाही.  माझ्या बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्हाला वेगवेगळ्या गावांत राहायला मिळाले. त्यामुळे लिहायला सुरु केलं तेव्हा आमचा तो प्रवास टिपावा असा विचार केला. तसा लेख लिहायला घेतला आणि लेखाची लांबी खूपच वाढायला लागली असे वाटले. त्यामुळे लेख एकापेक्षा जास्त भागांमध्ये विभागायचा ठरवलं. त्यातलाच एक भाग मिसळपाव वरील गणेश लेख मालेअंतर्गत प्रकाशित झाला. इतर काही भागांचे लेखन आधीच झाले असल्याने तेदेखील प्रकाशित करायचे ठरवले.     माझं आयुष्य काही जगावेगळं नव्हतं. त्यामुळे आठवणी पण तश्या साध्या सरळच आहेत. अश्या ह्या साध्यासुध्या आठवणींचे लेखन आपण रसि