Posts

Showing posts from 2021

आठवणी ५ - पुणे -१

Image
आईच्या आग्रहामुळे आम्हा भावंडांच्या शिक्षणाला स्थैर्य यावं ह्यासाठी, पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला आणि आमचा बाडबिस्तरा कायमचा पुण्याला हलवला. त्यामुळे बाबा बदलीच्या गावी आणि आम्ही मुलं आईबरोबर पुण्यात अशी आमची व्यवस्था ठरली. इतकी वर्षे लहान गावात राहिलेलो आम्ही पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहायला आलो. आम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा बदल होता. बाबांसाठी पण हा बदल मोठा होता. कारण त्यांना बदलीच्या गावी आठवडाभर एकटे राहावे लागणार होते. आता मोठं झाल्यावर जाणवतं की बाहेर कामावर असलेला ताण घरी आपल्या माणसांमध्ये आल्यावर निवळतो. पण बाबांना आता कामावरून घरी परत आल्यावर तो निवांतपणा मिळणार नव्हता.       मला तर आईचं खूपच कौतुक वाटतं. ४ मुलांना घेऊन पुण्यासारख्या शहरात तसा कोणाचा आधार नसताना राहणे सोपे नव्हते. आणि आम्ही मुलं अगदी अडनिड्या वयाची. मोठी बहीण नुकतीच बारावी झालेली, दुसरी बहीण दहावीत गेलेली, भाऊ नववीत आणि मी सहावीत. पण तिने ते शिवधनुष्य लीलया पेललं.           आम्ही पुण्यात आलो म्हणजे कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीमध्ये राहायला आलो. ३१ वर्षांपूर्वीची डहाणूकर कॉलनी म्हणजे कथा-कादंबऱ्यांमधले एक टुम

अळीवाचे लाडू

Image
माझ्या आईच्या माहेरी खूप मोठं कुटुंब. मला ५ मावश्या आणि २ मामा. त्यातली एक मावशी त्या मानाने जवळ राहायची आणि म्हणून आमचं खूप येणं-जाणं होतं. आम्ही मावशीकडे जायचो तसंच ती पण आमच्याकडे यायची. तिच्या घरापासून बस स्टॅन्ड साधारण ५-७ मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे आमच्याकडे  यायच्या एसटीच्या वेळेआधी १० मिनिटे घरातून बाहेर पडले तरी चालायचे. त्यात ती गाडीत जागा पकडण्यासाठी माझ्या मावसभावाला एसटीच्या मागच्या खिडकीतून चढायला लावायची. तर ह्या सगळ्या गडबडीत तिला आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून आणायच्या असायच्या. निघायच्या पाऊण-एक तास आधी वड्यांचे मिश्रण परतायला घेणार आणि निघायच्या जेमतेम आधी त्याच्या वड्या पाडून आमच्यासाठी डब्यात घालून आणणार. वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करणे तिचा  हातखंडा. त्यामुळे वड्या हमखास चांगल्याच झालेल्या असणार. पण हे सगळं मी आत्ता का सांगत आहे? तर मावशीचा ह्या बाबतीतला वारसा पुढे चालवायचं काम मला मिळालं आहे. गौरीपूजनाच्या दिवशी मैत्रिणीकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. आणि तिला आवडतात म्हणून मला अळिवाचे लाडू न्यायाचे होते. तरी खवलेला नारळ, गूळ आणि अळीव आदल्याच रात

तंबिटाचे लाडू

Image
खरं तर हा कर्नाटकातील पदार्थ. रोटी-बेटी व्यवहाराने कित्येकदा सीमा धूसर होतात. आमच्याकडे माझी आई माहेरची कानडी आणि मोठी बहीण लग्नानंतर कानडी. पण सीमाभागातील त्यांची गावं. त्यामुळे कित्येक कर्नाटकी पदार्थ माहितीतील आणि आवडीचे.  मागच्या महिन्यात मोठ्या बहिणीकडे गेले तेव्हा तंबिटाच्या लाडूचं प्रमाणा आणि पद्धत विचारली. त्यांच्याकडे हा लाडू नागपंचमीच्या वेळी करतात. नागपंचमीला हे लाडू करायचा माझाही बेत होता पण तेव्हा जमले नाही.  मग बाप्पाला नैवेद्य म्हणून हे लाडू केले. ह्या लाडवांचा आकारही विशिष्ट असतो - पेढ्यांसारखा दोन्ही बाजूंनी चपटा. मला काही तो आकार जमला नाही. पण चव मात्र जमली. साहित्य: डाळं ४ वाट्या सुकं खोबरे - १ वाटी किसलेले जाड पोहे १/२ वाटी तीळ - १/२ वाटी डिंक - ३ मोठे चमचे गूळ - ३ वाट्या चिरून वेलदोडे - ८ ते १० पूड करून बेदाणे काजू-बदाम पूड - १/२ वाटी (ऐच्छिक)  तूप - ४ वाट्या कृती: १. डाळं गरम करून घ्यावी, जेणेकरून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील.  २. डाळ्यांचे पीठ करून ठेवावे.  ३. तूपात डिंक तळून घ्यावा. डिंक छान फुलून आला पाहिजे.  ४. तळलेला डिंक गार होण्यासाठी बाजूला ठेवावा.  ५

चुकत माकत शिकलेले पालकत्व - ४ लवचिकता

Image
पालकत्वाचे काही सर्टिफिकेशन नसते. आपलं वागणं साचेबद्ध असू शकत नाही. परिस्थितीनुरूप आपले विचार व वागणे बदलता आले पाहिजे. हीच लवचिकता आपला सुजाण पालकत्वाचा प्रवास सुकर करते.

चुकत माकत शिकलेले पालकत्व - ३ क्षमा

Image
पालकत्वाचा प्रवास हा तसा सोपा नाही. त्या प्रवासात कित्येकदा आपण स्वतःवरच चिडतो. खूप त्रास करून घेतो. असं न करता स्वतःला क्षमा केल्याने आपला हा प्रवास सुकर होतो. आपल्याकडे क्षमेचे महत्त्व सांगितलेच आहे. ते खालील श्लोकात अधोरेखित होत आहे.         क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा। क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥ क्षमा हे दुर्बलांचे बल आहे तर सबलांचे भूषण. ह्या पूर्ण विश्वाला क्षमा नियंत्रित करते. क्षमेमुळे सर्व काही सध्या आहे.

चुकत माकत शिकलेले पालकत्व - २ स्वीकृती

Image
पालकत्वाच्या प्रवासातील एक पायरी म्हणजे स्वीकृती. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा स्वीकार करणे. ही पायरी पार केली की पुढची दारं उघडतात.        ह्याच स्वीकृतीबद्दल आपण ह्या भागात बोलणार आहोत.  

चुकत माकत शिकलेले पालकत्व १

Image
पालकत्वाचा प्रवास तसा सोपा नसतो. सगळंच नवीन असतं त्यामुळे चुका ह्या होणारच. पण मग स्वतःला दोष देत बसणे हा पर्याय नसतो.  माझा चुकत माकत शिकलेला पालकत्वाचा प्रवास आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

एक नवे पाऊल

Image
हा ब्लॉग सुरु केला तेव्हा अनामिक राहून व्यक्त व्हायला ठिकाण हवे होते. मला वाटतं, जमेल तसं व्यक्त होता आले पाहिजे असं वाटत होतं. पण तेव्हा तेही पूर्णपणे जमले नाही. सारखी मनात भीती असायची की कोणी चुकूनमाकून ओळखले तर!  ब्लॉग सुरु केल्यापासून एवढ्या वर्षांनी त्या अनामिकतेच्या पडद्याबाहेर यावेसे वाटत आहे. कोण काय म्हणेल ह्याचे ओझे बाजूला ठेवता येत आहे.  त्यामुळे माझ्या YouTube वरील व्हिडिओचे दुवे इथे देत जाणार आहे. मनस्विता ह्या नावामागील खरे नाव आणि खरा चेहरा समोर येणार आहे.              Photo by Wolfgang Rottmann on Unsplash

आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर

Image
खेडवरून बाबांची बदली बत्तीस शिराळ्याला झाली. शिराळा हे त्या मानाने लहान गाव असल्याने बाबांनी इस्लामपूरला बिऱ्हाड करायचे ठरवले. मला कळणाऱ्या वयातील ही पहिली बदली म्हणू शकू. तशी आमची मानसिक तयारी असायची की साधारण ३-४ वर्षे झाली की नवीन जागी बाडबिस्तरा हलवायचा. पण लहान असले तरी पुण्याजवळच्या गावातून लांब अश्या सांगली जिल्ह्यात आमचा मुक्काम हालला. इस्लामपूरला आलो तेव्हा मात्र मनाची हीच तयारी होती की जास्तीत जास्त एक वर्ष राहायचे आणि मग पुण्याला स्वतःच्या घरी कायमचे राहायला जायचे.   इस्लामपूर हे वाळवा तालुक्यातील एक गाव. पण तरी वाळव्यापेक्षा बरेच मोठे गाव आहे. आमचा इस्लामपूरला जेमतेम १० महिन्यांचा मुक्काम होता. त्यामुळे तिथल्या माझ्या आठवणी फारच मर्यादित स्वरूपाच्या आहेत. पण बाबांबरोबर जी फिरस्ती झाली त्यातला हा एक टप्पा होता. आणि आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती , जागा काही कारणाने आणि आपलं परस्परांप्रती काही देणे असते म्हणून येतात. तसाच आमच्या आयुष्यातील इस्लामपूरचा टप्पा.   आईबाबांनी आधीच येऊन एक घर भाड्याने घेतले. जराशी गावाबाहेर असलेली ती बंगल्यांची कॉलनी होती. त्या कॉल