Posts

Showing posts from September, 2012

शिक्षक दिन विशेष - देसाई सर

मी सहावीत असताना पुण्यात आले. आमची शाळा मुला-मुलींची असली तरी सकाळची शिफ्ट मुलींची आणि दुपारची मुलांची असं होतं. त्याप्रमाणे लागणारा शिक्षक वर्ग पण असायचा. सकाळी शिक्षिका जास्त. तर दुपारी मुलांना हाताळू शकतील असेल शिक्षक जास्त. असो. मग सातवीत गेल्यावर आमचा मुला-मुलींचा एकत्र असा वर्ग झाला. तथाकथित हुशार मुलांची तुकडी. आणि शाळा झाली दुपारची. तेव्हा आम्हाला पीटीला देसाई सर म्हणून आले. ते नक्कीच साचेबद्ध शिक्षकापेक्षा वेगळे होते. पीटीचे सर असल्याने कडक तर होतेच पण त्या बरोबर मुलांमध्ये मिसळून जायची कला त्यांच्याकडे पण होती. त्यांचं वाचन भरपूर होतं. आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांनी केलेलं वाचन अथवा त्यांनी बघितलेला पिक्चर गोष्टी रुपात आमच्या पर्यंत पोहोचवता यायचं. मला अजून आठवतंय त्यांनी 'शर्थीने राज्य राखले' ह्या कादंबरीतले काही भाग आम्हाला सांगितले होते. खूप भारावून गेल्यासारखं झालं होतं. त्याच बरोबर त्यांनी आम्हाला 'फ्रॅन्केनस्टाईन' ह्या पिक्चरची गोष्ट सांगितली होती. आज विकी वर पाहिलं तर १९३१ सालचा तो पिक्चर आहे. त्यांनी तो कधी बघितला असावा काय माहित! पण त