Posts

Showing posts from March, 2011

पोलीसमामा

आज ऑफिस मधून निघाल्यावर खूप दमल्यासारखा वाटत होतं. आणि तरीही काही काम पूर्ण झालंय असं वाटत नव्हतं. Performance measurement साठीचं self -assessment manager ने आज पर्यंत भरून ठेवायला सांगितलं होतं ते पण झालं नव्हतं.  अगदी कंटाळून गेल्यासारखं झालं होतं.     मग घरी यायला निघाले तर युनिवर्सिटी सर्कल पाशी पोहोचल्या पोचल्या सिग्नल लागला. त्यामुळे गाडी सर्वात पुढे होती. जवळ जवळ २ मिनिटांचा सिग्नल असल्याने मग गाडी बंद करून निवांत इकडचं तिकडचं निरीक्षण चालू होतं. आणि आमचा सिग्नल सुटायला जेमतेम ४० सेकंद उरले असतील आणि औंध रस्त्याने शिवाजी नगर कडे जाणारा एक टेम्पो अचानक उजवीकडे पाषाण रोडला जाण्यासाठी वळला. आणि युनिवर्सिटीच्या गेटच्या बाहेर ट्राफिक पोलीस होते. त्यांनी त्या टेम्पोला थांबवण्यासाठी हात केला. परंतु तो टेम्पो न थांबता पुढे जाऊ लागला. मग त्यांच्यात एक इन्स्पेक्टर होता तो पळत त्या टेम्पोच्या मागे जाऊ लागला. तसे युनिवर्सिटी गेट ते पाषाण रोडची बाजू बरेच अंतर आहे. आणि ती इन्स्पेक्टर तसा बराच सुदृढ होता. पण त्याने पळत पळत जाऊन त्या टेम्पोला गाठले आणि त्याला थांबवले. सगळ

२१ दिवस - एक सवय

मागच्या वर्षी आमच्या कंपनी मध्ये एक ट्रेनिंग झाला होतं. Behavioural training! त्यात आमच्या ट्रेनरने बर्याच गोष्टी सांगितल्या. त्यातली एक गोष्ट होती - एखादी सवय अंगी बाणवण्यासाठी ती गोष्ट रोज अशी सलग २१ दिवस जाणीवपूर्वक करायची. असे करण्याने ती सवय तुमच्यात रुजते. म्हणजे तुमच्या मेंदूच्या एका भागाशी थेट कनेक्शन होते म्हणे. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट आपोआप नियमितपणे करू लागता म्हणजेच ती सवय तुमच्या अंगी बाणली जाते. जसे एखादे ट्रेनिंग संपले की त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी आपण आचरणात आणायचं ठरवतो तसंच हे ट्रेनिंग संपल्यावर सुद्धा ही गोष्ट करायची ठरवली होती. कधी ऑफिसला वेळेवर पोहोचण्याचा नेम धरायचा ठरवला तर कधी नियमित व्यायाम करायचं ठरवलं. पण ३-४ दिवसातच उत्साह मावळायचा आणि पहिले पाढे पंचावन्न!   मग असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या पुस्तकी गोष्टी आहेत आणि त्या असल्या ट्रेनरने फक्त शिकवायच्या. आणि आपण तेवढ्या पुरतं ऐकून सोडून द्यायच्या. पण मनात कायम असे विचार येत राहायचे की आपण साधी एक सवय अंगिकारू शकत नाही! आणि मग काय एक दिवस असंच आलं मनात आणि ठरवून टाकलं की नियमित व्या

स्नेहसंमेलन - २

काल झालेले माझ्या धाकटीचे स्नेह-संमेलन हा एक अत्यंत आनंददायी, मनाला सुखावणारा अनुभव होता. आधीच्या पोस्टमध्ये लिहिलं त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि त्याचं त्या सुंदर कार्यक्रमाच्या स्वरूपामधलं ते फळ बघून खरच खूप आनंद झाला. पण सर्वात जास्त आनंददायी गोष्ट म्हणजे माझ्या कन्येने केलेला डान्स, तिची देहबोली, तिचं मुलीसारखं दिसलेलं गोंडस रूप. (माझी धाकटी कन्या अगदी Tom-boy आहे. म्हणजे ती कपडे फक्त शर्ट आणि pant घालते. केसांना क्लिप, रबर लावणे तर दूरच पण चुकूनही भांग सुद्धा पाडत नाही.) तिला प्रथम तिच्या शिक्षकांनी 'माकारीना' ह्या गाण्यावरच्या डान्स मध्ये घेतलं होतं. पण आधी सांगितलं त्याम्प्रमाणे तिची देहबोली, तिचं आत्मविश्वास बघून त्यांनी तिला 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' ह्या गाण्यात सुद्धा तिला घेतले. त्या गाण्यात सर्व प्राणी आणि पक्षी सुखाने एका जंगलात नांदत असतात आणि अश्या ह्या जंगलात एक मुलगी बागडत असते. तर ती मुलगी माझ्या धाकट्या कन्येने साकारलेली. आणि सर्वात शेवटी सर्व लहान मुलांचा हात धरून पर्यावरण वाचवा हे सांगणारा बोर्ड हातात घेणे हे

स्नेह-संमेलन

कालच्या पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे आज आमच्या शेंडेफळाच्या शाळेचे स्नेहसंमेलन होते. आमच्या सर्वांची वरात (५ मोठी आणि ३ लहान अशी ८ माणसे एका गाडीत!) ९ वाजता टिळक स्मारकला पोहोचली. तर टिळक स्मारकचा परिसर लहान-लहान मुले आणि त्यांचे पालक, आज्जी-आजोबांनी फुलून गेला होता. (माझी धाकटी जिथे जाते ती शाळा एक playgroupची शाळा आहे. वय वर्षे १.५ ते जास्तीत जास्त ३.५ पर्यंत.)  माझी कन्या एका डान्स मध्ये होती. त्यासाठीचा केवळ तिचा फ्रॉक शिवून न झाल्याने तिला फक्त चेहर्याला मेकप करून तिच्या शिक्षकांच्या ताब्यात द्यायचं होतं. ९ पर्यंत तिथे पोहोचायचे असल्याने तिचे प्रातर्विधी, आंघोळ आणि नाष्टा एवढे आटोपून कसेबसे तिथे पोहोचल्याने मेकपचा कार्यक्रम तिथे चालू झाला. मग एकदम गुलाबी गुलाबी गाल, गडद गुलाबी ओठ असा मेकप करून तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केलं.       मग साधारण पावणे दहाच्या सुमारास कार्यक्रम चालू झाला. आधी त्यांनी कार्यक्रमाची रूप-रेषा समजावून सांगितली त्याप्रमाणे एकूण ८ डान्स होते. आणि सर्वात शेवटी बक्षीस समारंभ. कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर मूळ कार्यक्रम चालू झाला

रंगीत तालीम

उद्या माझ्या धाकट्या कन्येच्या शाळेचे स्नेह-संमेलन टिळक स्मारक येथे आहे. त्याची रंगीत तालीम आज तिथेच होती. सकाळी ९:३० ला तिथे सोडायचे आणि १२:३० वाजता परत घेऊन यायचे. टिळक स्मारक म्हणजे घरापासून बर्या पैकी लांब. मग कोणाल सांगणार म्हणून खास सुट्टी काढून त्या मोहिमेवर गेले. ९:३० वाजता तिथे पोहोचलो आणि तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केल्यावर प्रश्न उरला की तीन तास काय करायचे! पहिले अर्धा-एक तास तिथेच जवळ असलेल्या ग्राहक पेठेत वेळ घालवला. आणि थोडी फार खरेदी केली. (थोडी खरोखर गरजेची आणि फार उगाचच अवांतर). पुन्हा प्रश्न उरला की आता काय करायचे. शेजारीच S.P. कॉलेज आहे. माझं कॉलेज. खरं तर अकरावी आणि बारावी अशी दोनच वर्षे तिथे काढलेली. पण शाळेतल्या शिस्तबद्ध आणि बंधनयुक्त काळानंतरचा पहिला काही काळ तिथे घालवलेला. त्यामुळे बर्याच आठवणी जोडलेल्या. तसं ते कॉलेज सोडून आता जवळा जवळ १५-१६ वर्षे झाली. आणि एकदा बारावीचा रिझल्ट घेतल्यावर कधी तिकडे मी गेलेच नाही.         मग आज विचार केला की जाऊन तर बघुयात. खरं तर अकरावी-बारावीला कोणी फार कॉलेजला जाऊन बसतं असं नाही. पण तरीही काही काही शिक