Posts

Showing posts from April, 2020

चॉकोलेट चिप कुकीज (कढईमधे)

Image
साहित्य: १. मैदा १ कप २. पिठी साखर १/३ कप ३. जाड पोहे किंवा ओट्स २ चमचे ४. लोणी(घरी तयार केलेले किंवा अनसॉल्टेड बटर) १/२ कप ५. खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा) १/८ टी स्पून ६. मीठ चिमूटभर ६. चॉकोलेट चिप्स किमान १/४ कप   कृती: १. लोणी फ्रिजबाहेर काढून ठेवलेले असावे. एका खोलगट भांड्यात लोणी आणि पिठी साखर एकत्र करावी. आणि बीटरने चांगले एकजीव करून घ्यावे. इलेक्ट्रिक बीटर असेल तर लवकरात हे मिश्रण एकत्र आणि मऊसूत होते. २. ओट्स किंवा जाड पोहे कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी.     ३. बारीक चाळणीने मैदा, सोडा आणि मीठ हे साहित्य एकत्र एका वेगळ्या ताटात चाळून घ्यावे. ४. क्रमांक ३ च्या पायरीतील पदार्थ आणि बारीक केलेली पोहे/ओट्सची पूड लोणी आणि पिठी साखरेचे जे तयार मिश्रण आहे त्यात एकत्र करावेत. आणि बीटरने पुन्हा सर्व पदार्थ एकजीव करावेत. ५. आता ह्या सर्व पदार्थांचा मऊसूत गोळा तयार होईल. ह्यात चॉकोलेट चिप्स घालून अलगद एकत्र करावे. ६. आता ह्याचे १२ एकसारखे गोळे करून घ्यावेत. ७. दरम्यान कढई गॅसवर मध्यम आचेवर १० मिनिटांपर्यंत तापायला ठेवावी. (कढई पातळ बुडाची असे

केशर मलई कुल्फी

Image
साहित्य: दूध १/२ लीटर साखर १/२ वाटी मिल्क पावडर ४ चहाचे चमचे साय २-३ चमचे १० - १२ केशराच्या काड्या कृती: १. एका कढईत दूध तापवायला ठेवावे.  २. दुधाला उकळी आल्यावर १० मिनीटे उकळू द्यावे.  ३. आता ह्या दुधात साखर घालून पळीने ढवळावे.  ४. साखर विरघळल्यावर त्यात मिल्क पावडर घालावी. पळीने व्यवस्थित ढवळावे म्हणजे दुधाची पावडर नीट एकजीव होईल. ५. केशराच्या काड्या दुधात (साधारण १/४ वाटी दूध) मिसळून ते दूध उकळत्या दुधात घालावे.  ६.आता ह्यात साय घालून २ मिनीटे उकळू द्यावे.  ७. गॅस बंद करून हे दूध गार करायला ठेवावे.  ८. दूध गार झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. म्हणजे सायीचे तुकडे एकजीव होतील.  ९. आता हे दूध कुल्फीचे मोल्ड असतील तर त्यात किंवा कुल्हड़ असतील तर त्यात किंवा हवाबंद डब्यात घालून फ्रीजरमधे ठेवावे.  १०. ५-६ तासात कुल्फी तयार.  टीप: १. कुल्हड़ मध्ये घालून कुल्फी करायला ठेवल्यास अॅल्युमिनियम फॉईल वापरून घट्ट बंद करावे.  २. आवडत असल्यास बदाम आणि पिस्त्याचे काप देखील घालू शकता.  ३. ह्या प्रमाणात ४ माणसे मनसोक्त कुल्फी खाऊ शकतात. 

केक थालिपीठ

Image
असे वाटत असेल ना की ही कुठली पाककृती देत आहे मी. कृती पारंपारिकच आहे परंतु लक्ष वेधले जावे म्हणून नावाला ट्विस्ट दिला आहे. केळ आणि कणकेचे गोडाचे थालिपीठ आहे हे.  म्हणून केक (केळ आणि कणकेचे) थालिपीठ.  आज प्रथमच मी केले आणि खाल्ले देखील. परंतु चवीची पावती नवर्याने दिली कारण त्याने त्याच्या लहानपणी खाल्ले आहे.  घरी केळी आणून बरेच दिवस झाले होते आणि २ केळी उरून खूप पिकली होती. इतरवेळी कदाचित टाकून दिली असती. पण सध्याच्या काळात आहे ते जिन्नस टाकून न देता कसे वापरता येईल ह्याचा विचार केला जातो. मग केळ घालून शिरा करायचा ठरवला पण २ केळी जास्त झाली असती. मग १ केळ वापरून शिरा आणि दुसरे केळ वापरून ही थालिपीठे केली.  साहित्य: केळ - १ कणिक - साधारण १.५ वाटी गूळ - २ मोठे चमचे अगदी बारीक चिरून मीठ - चिमूटभर कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून जरा मळल्यासारखे केले. आणि गरजेनुसार पाणी घालून जरा सैलसर पीठ मळले.  ह्या पिठाचे ४ एकसारखे गोळे केले आणि लहान लहान थालिपीठे थापून तुपावर भाजली.  नेहमीची थालिपीठे भाजतो तसे प्रथम झाकण ठेवून भाजले.  तुपावर दोन्ही बाजूने भाजली