अश्याच एका शांत दुपारी होते निरभ्र आकाश अन् पाहता पाहता आले मळभ दाटून जुन्या आठवणींचा जणू तळ आला ढवळून चहू दिशा अंधारल्या जीव गेला घाबरून वाटे येईल आता सोसाट्याच्या वारा जाईल झोडपून आसमंत सारा पण पाहते तो काय केवळ होत्या संततधारा आला होता भीज पाऊस चिंबवून गेला भोवताल सारा!
आधी सांगितलं तसं drawing क्लास चालू केला आहे. मधे माझ्या ताईच्या घरी काही अडचणी असल्याने बरेच दिवस क्लास बंद होता. आणि मग जेव्हा पुन्हा सुरु झाला तेव्हा उठून क्लासला जाणे नको वाटत होते. पण विचार केला की आत्ता जर आळस केला तर माझा क्लास कायमचा बंद होईल. म्हणून मग नेटाने पुन्हा चालू केला आहे. आज जे चित्र इथे पोस्ट करत आहे त्याच्यावर बरेच दिवस काम चालू होते. आधी रेखाचित्र काढणे आणि मग रंगवणे. माझ्या ताईच्या म्हणण्या नुसार जसजशी मी चित्रे काढत जाईन तसतशी चित्रात रंग भरताना जास्त वेळ लागेल. कारण जास्त details लक्षात येउन तसे रंगवण्याचा प्रयत्न असेल. असो. तर ह्या चित्राला पण बराच वेळ लागला.
अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून माझी मोठी मुलगी आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते. आम्ही दोघी वेगवेगळ्या भागात पुस्तके पाहत होतो. तेवढ्यात तिथल्या तिथेच मला माझ्या मुलीचा फोन आला. ती जिथे होती तिथे ती मला बोलावत होती. झालं असं की ती तिथे पुस्तकं पाहत असताना, तिथे आलेल्या इतर काही जणी चित्कारल्या 'ई.. हे बघ Mills & Boon!' आणि माझ्या मुलीला तिथे Mills & Boon च्या पुस्तकांचा ढीग दिसला. तो पाहताच तिने मला लगोलग फोन केला. मी तिथे गेले आणि अत्यानंदाने दोन पुस्तके घेऊनच टाकली. काहींना Mills & Boon हे प्रकरण काय आहे हे माहीत नसेल म्हणून सांगते. रोमँटिक कथांची ही पुस्तके असतात. दर पुस्तक वेगळ्या लेखिकेचं ...
I disagree... Prayer is just theory, in order to make it practical, we have to do good deeds, i.e. Only good deeds will purify the soul
ReplyDeleteHmmm... What I believe is a prayer leads us to a path to do good deeds.
ReplyDelete