Thursday, March 22, 2012

Rosy picture

मी माझी जुनी कंपनी सोडली आणि नवीन जागी रुजू झाले. आता त्याला सुद्धा जवळ-जवळ एक महिना होत आला. पण आधीच्या ठिकाणी मी साडेसहा वर्षे होते त्यामुळे खूप जास्त गुंतले होते. 

आता जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिथला अनुभव एखाद्या 'Rosy picture' सारखा वाटतो. केवळ चांगल्या आठवणीच दिसतात. म्हणून हे शीर्षक. (मी विचार करत होते की आपला ब्लॉग मराठी आणि शीर्षक मात्र इंग्रजी देणं कितपत योग्य! पण मग मला चांगला मराठी प्रतिशब्द सुचला नाही. मग विचार केला की भाषा ही मनातल्या भावना दुसर्यापर्यंत पोहोचवायचं माध्यम. त्यामुळे उद्दिष्ट महत्वाचं आणि माध्यम दुय्यम.) असो.

पुन्हा विचार करत होते की तिथल्या आठवणी म्हणजे चांगल्या आणि वाईट अनुभवांचं मिश्रण. म्हणजे 'Rosy picture' मध्ये काटे पण असतात पण दिसत नाहीत. माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालंय. फक्त चांगल्या आठवणींचा गंध येतो आणि काटे काही सलत नाहीयेत.


टीप: प्रकाशचित्र इंटरनेटवरून साभार.