कांदा कैरीची चटणी
कांदा कैरीची चटणी (with English version of the recipe) कांदा कैरीची चटणी हा प्रकार माझ्या सासरी म्हणजे सोलापूर भागात विशेष प्रचलित आहे. माझ्या माहेरी वडील मराठवाड्यातले तर आई कानडी वैष्णव. आईच्या स्वयंपाकात कांदा-लसणाचा वापर अगदी नगण्य होता. त्यामुळे माझी माझी बारावी होईपर्यंत मला जेवणात कांदा खायची सवय नव्हती आणि त्यामुळे आवड. त्यामुळे मी माझ्या आत्याकडे सोलापूरला गेले की आत्या कांदा-कैरीची चटणी करायची आणि माझ्यासाठी खास फक्त कैरीची चटणी करायची. पण मग बारावी पूर्ण केल्यानंतर मी शिक्षणासाठी पुण्याबाहेर गेले आणि हॉस्टेलमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कांदा घातलेला असायची सवय करून घ्यावी लागली. सुरुवातीला फार अवघड आणि त्रासदायक होतं. पण हळूहळू सवय झाली. लग्नानंतर नवऱ्याला कांदा-लसूण घातलेला खूप आवडत असल्याने आता माझ्या स्वयंपाकात त्यांचा सर्रास वापर असतो. म्हणजे आमच्याकडे वैशाखात नरसिंहाच्या नवरात्र असतं तेव्हा कांदा-लसूण पूर्ण वर्ज्य असते, तेव्हा स्वयंपाक करणे फार अवघड जाते. तर आज मुद्दा आहे तो कांदा कैरीच्या चटणीच्या पाककृतीचा. चटण्या करायच्या म्हणजे...