कढिपत्त्याची चटणी

कढिपत्त्याची चटणी 
साहित्य:
कढिपत्त्याची पाने - एक वाटी
कारळे - २ मोठे चमचे
तीळ    - २ चमचे
सुके खोबरे (पातळ क‍ाप) - २ चमचे
सुक्या लाल मिरच्या - ५ - ६
लाल तिखट - २ - ३ लहान चमचे 
चिंच - १-२ बुटुक
गूळ - किंचित चवीपुरता
मीठ - चवीपुरते


कृती:
१. कढिपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन घेणे. 
२. कढिपत्त्याची पाने किंचित तेलात परतून घेणे. 
३. सुक्या मिरच्या व चिंच किंचित तेलात परतून घेणे.
४. कारळ, तीळ आणि सुके खोबरे तेल न घालता वेगवेगळे परतून घेणे.
५. सर्व भाजून घेतलेले पदार्थ, तिखट, गूळ आणि मीठ एकत्र करून मिक्सर मधे बारीक करणे.

अशी तिखट आणि किंचित आंबटगोड चवीची चटणी तयार आहे.

हयामधे कढिपत्त्याचे प्रमाण आवडीनुसार वाढवू शकता.

पाककृतीचा स्रोत: माझी आई 




Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा