देवता

कोणी तरी तिला सांगितले होते की नदीच्या त्या किनार्या लगतच्या डोंगरापलिकडे एक देऊळ आहे. त्या देवळातल्या देवतेकडे सुखासमाधानाची किल्ली आहे.

मजल दरमजल करत ती पोहोचली त्या देवळात. तर मूर्तीच्या जागी एक लख्ख आरसा होता.


===============================



मायबोली ह्या संकेत स्थळावर मराठी भाषा दिन २०१८ साजरा केला. त्यात गोष्ट तशी छोटी हा उपक्रम होता. गोष्टीमधे किनारा, डोंगर, आरसा हे शब्द येणे अपेक्षित होते. तर त्यात लिहिलेली ही गोष्ट. 

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा