का रे भुललासी वरलीया रंगा - कारल्याची भाजी
- Get link
- X
- Other Apps
मध्यंतरी मराठी आंतरजालावर ही पाककृती पहिली होती. करून पहावी असे बरेच दिवस डोक्यात घोळत होते. आज त्याला मुहूर्त लागला. रूप काही आकर्षक नसले तरी चव उत्तम आहे. कारल्यांना मीठ लावून ठेवा, बिया काढा असला काही उपदव्याप नाही.
साहित्य:
कारली (कोवळी) - १/४ किलो
कांदा - १ मोठा
दाण्याचा कूट - २ चमचे
गोडा मसाला - १ चमचा
तिखट - १/२ चमचा
साखर - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, जिरे, हिंग व हळद
कृती:
१. भरताची वांगी भाजतो तशी कारली भाजून घ्यावी.
२. कारली थंड झाल्यावर चकत्या करून घ्याव्या.
३. कांदा उभा चिरून घ्यावा.
४. कढईत साधारण १ पळीभर तेल घेऊन मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून कडकडीत फोडणी करावी.
५. फोडणीत कांदा चांगला परतून घ्यावा.
६. ह्यात कारल्याच्या चकत्या, दाण्याचा कूट, मसाला, तिखट, मीठ व साखर घालून झाकून ठेवावे.
७. एक दणदणीत वाफ येऊ द्यावी.
८. अशी ही गरमागरम भाजी पानात वाढून घेऊन लगेचच आस्वाद घ्यावा.
- Get link
- X
- Other Apps
वेगळा प्रकार आहे....नक्की करून बघणार
ReplyDelete