उसू पराठा

तर आंतरजालावरच्या एकूण वावरातून असं निदर्शनास आले आहे की पदार्थ काहीही असला तरी नाव आणि फोटो दिलखेचक असले पाहिजेत. त्यामुळे हे नाव. त्यातले घटक पदार्थ काय आहेत हे वाचून तुम्हालाही हे लक्षात येईल.
तर सर्वात प्रथम आपण घटक पदार्थ काय आहेत ते बघू.
कणिक
आदल्या रात्रीची पालक, मेथी आणि चुक्याची पातळ भाजी
लसणाच्या दोन पाकळ्या
थोडी जिरे पूड
हळद
तिखट
मीठ
कृती:
सर्व घटक पदार्थ एकत्र करून आणि अगदी गरज लागेल तसे पाणी मिसळून गोळा मळून घ्या.
तेलाचा हात लावून १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
आता लहान लहान गोळे करून पराठे लाटून घ्या आणि खरपूस भाजून घ्या.
आवडीप्रमाणे चटणी, लोणचे अथवा सॉस ह्यांच्या सोबत ह्या पराठ्यांचा चट्टामट्टा करा.
इथे मी चटणी वाढली आहे. चटणी घरचीच आहे पण सोलापूरच्या खैरमोडयांच्या! 😀
तर साहित्य आणि कृती वाचून नावाचा उलगडा झालाच असेल. आणि नसेल तर आता सांगते. उसू पराठा म्हणजे उरलेसुरल्याचा पराठा!
 

Comments

  1. उसू पराठा म्हणजे उरलेसुरल्याचा पराठा! हे वाचुन हसु आवरेना . बाकी छान लिहीता

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आवर्जून प्रतिसाद देण्याकरता!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)