दिल के टुकडे टुकडे कर के...

सकाळी सकाळी काय माझा देवदास झालाय असं वाटत असेल ना! पण तसं काही नसून कहानी में थोडा twist हैं! 

आज सकाळी आलं मनात फ्लॉवरची भाजी करूयात आणि घालू म्हणलं बटाटा त्यात. पण हाय रे कर्मा! बटाटे तर संपले होते. आणि संभाला था मैंने बहोत अपने दिल को म्हणत जो बटाटा बाजूला ठेवला होता तो वापरायची वेळ आली. हाच तो फोटोमधला बटाटा - दिलवाला बटाटा!


 
मग काय 'दिल के टुकडे टुकडे कर के, मुस्कुरा के चल दिये' म्हणत म्हणत भाजीत घालण्यासाठी त्याचे काप केले. त्याचाही फोटो इथे डकवला आहे. मग म्हणाल मुस्कुरानेवाली मी कुठे आहे? तर सकाळी सकाळी डब्याच्या घाईमध्ये बराच अवतार असतो. म्हणजे दिवसभरात अनेकविध कामे पार पडताना वेगवेगळे अवतार धारण करावे लागतात त्यातलाच एक असतो, पण तरीही त्याचा फोटो काढून चारचौघात दाखवण्यासारखा नसतो.



पण सकाळच्या गडबडीचा वेळेत एका बटाट्याने मूड एकदम फिल्मी केला म्हणून इथे त्याचं कौतुक सांगावं म्हटलं.  

आता विचाराल की भाजीचा फोटो कुठे आहे? तर भाजी गेली डब्यात भरून. 

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)