कांदा कैरीची चटणी


कांदा कैरीची चटणी (with English version of the recipe) 

कांदा कैरीची चटणी हा प्रकार माझ्या सासरी म्हणजे सोलापूर भागात  विशेष प्रचलित आहे. माझ्या माहेरी वडील मराठवाड्यातले तर आई कानडी वैष्णव. आईच्या स्वयंपाकात कांदा-लसणाचा वापर अगदी नगण्य होता. त्यामुळे माझी माझी बारावी  होईपर्यंत मला जेवणात कांदा खायची सवय नव्हती आणि त्यामुळे आवड. त्यामुळे मी माझ्या आत्याकडे सोलापूरला गेले की आत्या कांदा-कैरीची चटणी करायची आणि माझ्यासाठी खास फक्त कैरीची चटणी करायची.

पण मग बारावी पूर्ण केल्यानंतर मी शिक्षणासाठी पुण्याबाहेर गेले आणि हॉस्टेलमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कांदा घातलेला असायची सवय करून घ्यावी लागली. सुरुवातीला फार अवघड आणि त्रासदायक होतं. पण हळूहळू सवय झाली.

लग्नानंतर नवऱ्याला कांदा-लसूण घातलेला खूप आवडत असल्याने आता माझ्या स्वयंपाकात त्यांचा सर्रास वापर असतो. म्हणजे आमच्याकडे वैशाखात नरसिंहाच्या नवरात्र असतं तेव्हा कांदा-लसूण पूर्ण वर्ज्य असते, तेव्हा स्वयंपाक करणे फार अवघड जाते.

तर आज मुद्दा आहे तो कांदा कैरीच्या चटणीच्या पाककृतीचा.

चटण्या करायच्या म्हणजे जरा पारंपारिक गोष्टींचा अवलंब केला की त्या त्या चटणीची अपेक्षित चव साधली जाते.  त्यामुळे ही चटणी करताना मी दगडी खल-बत्त्याचा वापर केला आहे. ह्या खल-बत्त्याची पण गोष्ट आहे. तो जो खल आहे तो माझ्या आज्जेसासुबाई (सासऱ्यांची आई) यांचा आहे तर बत्ता दुसऱ्या आज्जेसासुबाईंचा (सासूबाईंच्या आई) आहे. तर दोन वेगवेगळ्या स्त्रियांच्या स्वयंपाकघरातल्या वस्तू तिसरीच्या स्वयंपाकघरात सुखेनैव नांदत आहेत. चटणी कैरीची असल्याने तिला लोखंडी खल-बत्त्यात करता येत नाही, काळी पडते.



किती तो माझा गोष्टीवेल्हाळपणा! आता खरंच पाककृतींची सुरुवात करते.

साहित्य:
१. कैरी              - १/२ 
२. कांदे             - २ मध्यम आकाराचे 
३. तिखट           - २-३ चमचे (मी ब्याडगीचे वापरले आहे) 
४. गूळ              - १ वाटी बारीक चिरून
५. दाण्याचा कूट - २ चमचे 
६. मीठ             - चवीनुसार 
७. फोडणीसाठी - तेल, मोहरी आणि हिंग


कृती:
१. अर्धी कैरी साल काढून चिरून घ्यावी. 
२. कांदाही चिरून घ्यावा. 
३. आता कांदा, कैरी, तिखट, मीठ, गूळ आणि दाण्याचं कूट हे साहित्य एकत्र करून दगडी खलबत्त्यात कुटून घ्यावे. 
४. दगडी खलबत्त्यात बारीक केल्याने सर्व साहित्य एकजीव होते आणि आणि कांद्यालाही खूप पाणी सुटत नाही. खूप बारीक ना कुटता जाडसर कुटायची.
५. चटणी कुटून झाल्यावर कुंड्यात काढून फोडणी द्यावी. 

टीप:
१. ही चटणी कांदा असल्याने फ्रिजमध्ये ठेवावी लागते.
२. कांदा किसलाअसता त्याला पाणी सुटते. अश्या पद्धतीने चटणी केल्यास फार पाणी सुटत नाही. 
३. आपण ही चटणी मिक्सरमधे पण करू शकतो. परंतु एकदम खूप बारीक होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. 



Onion chutney with raw mango

My father hails from Marathwada region in Maharashtra where onion is used quite commonly in the day to day food preparation. But my mother’s family is kannada vaishnav; hence she had minimal usage of onion and garlic in her food preparation. Hence I did not like onion much till I completed my 12th standard.

But I had to stay away from my family in the hostel and had to have food which had ample use of onion in it. Initially it was very difficult for me to consume such food, but later I got used to it.

My husband just loves usage of garlic and onion in the food preparation; hence nowadays most of the food preparation at my home includes onion and garlic.

If the chutneys are prepared in a traditional way, they taste better. So I used rock mortar and pestle. The mortar that I have once belonged to my father in law’s mother and the pestle to mother in law’s mother.

Now I should actually start with the recipe.

Ingredients:

Raw mango              –  ½

Onions                      – 2 medium sized

Red chilli powder    – 2-3 spoons (I used Byadagi chilli powder)

Jaggery                      – 1 cup (grated)

Groundnut powder – 2 tea spoons

Salt                            – as per your taste

For tadaka               – oil, mustard seeds and asafetida

Procedure:

1. De-skin the raw mango and cut it into small pieces

2. Chop the onion in small pieces (not very fine). 

3. Mix onion, raw mango, jaggery, red chilli powder, groundnut powder and salt in the mortar and grind the ingredients together. It should be ground coarsely.

4. Once ground, transfer it to a bowl and add tadaka to it.

The chutney is ready to eat.

Please note:
1. As it contains onion, you should store it in the refrigerator.
2. You can make this chutney in a mixer grinder as well. But ensure that you don't grind it into a very fine paste. This chutney tastes better in coarse consistency. 

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)