सुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या

आज माझ्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्यामुळे त्यांना भेटायला जायचे होते. इतके वर्ष नोकरी करत असताना कायम बाबांना आवडतात म्हणून बाहेरून ढोकळे वगैरे घेऊन जायचे. पण आज ठरवले की आपण स्वतः  करून न्यावे. बाबांना आवडते म्हणून सुरळीची वडी करावी असे ठरवले. मदतीसाठी हमखास पाकसिद्धीच्या देशपांडे काकू होत्याच. (हमखास पाकसिद्धी हे एक पुस्तक पाककृतींचे मराठीतील पुस्तक आहे. माझ्या बहिणीने मला लग्न झाल्या झाल्या भेट म्हणून दिले होते. माझं फार आवडतं पुस्तक. कारण त्यात नवशिक्यांसाठी व्यवस्थित प्रमाण दिलेले आहे. त्याचबरोबर कृतीसुद्धा अगदी मुद्देसूद आहेत. आणि टीपांमध्ये काही युक्त्या आणि काय चुका होऊ शकतात हेही दिलेलं आहे. काहीकाही ठिकाणी चुका कश्या निस्तरायच्या हेही दिले आहे. अरे बापरे! मी तर पुस्तकाचे परीक्षणच सुरु केले.) पुन्हा मुद्द्याचं बोलते.
तर कित्येक वर्षांमध्ये केलेली नसल्याने प्रचंड भीती वाटत होती. मग काय सुरु  केलं मी "शुरु करें सुरळीची वडी, लेके प्रभू का नाम". म्हणलं 'म' आलं म्हणजे मस्तंच होणार वडी. आणि एवढं आवर्जून आईबाबांसाठी करत आहे म्हणल्यावर चांगलीच होणार.
माझे बाबा स्वतः खूप वेगवेगळे पदार्थ चांगले बनवतात. त्यामुळे त्यांना चवीचं आणि पदार्थ करायच्या तंत्राचं खूप चांगलं ज्ञान आहे. त्यामुळे मी एवढं कौतुकाने करून नेलं तरी त्यांच्या पसंतीस उतरेल की नाही शंका. पण बाबांनी चांगली झाली असे सांगून आवडीने खाल्ली. 
त्यामुळे साग्रसंगीत साहित्य आणि कृती सांगणे आलेच.साहित्य:
१. डाळीचे पीठ/बेसन - १ वाटी 
२. मैदा                    - १ चमचा 
३. आलं                   - १ इंचाचा तुकडा 
४. हिरवी मिरची        - १-२ 
५. आंबट ताक          - पाऊण वाटी 
६. हळद                  - १/४ चमचा 
७. मीठ                   - चवीनुसार
सजावटीसाठी:
१. खवलेला नारळ    - १/२ वाटी 
२. कोथिंबीर            - १/४ वाटी (धुवून आणि बारीक चिरून) 
फोडणीसाठी:
१. तेल - २ मोठे चमचे 
२. मोहरी 
३. जिरे 
४. हिंग 
५. किंचित हळद
**सुरळीच्या वड्या पसरवण्यासाठी ३ स्वच्छ आणि कोरडी ताटे तयार ठेवणे. 
कृती: 
१. सर्वप्रथम फोडणी करून बाजूला ठेवा. (आपल्याला फोडणी गार करून वापरायची आहे.)
२. एक भांड्यात डाळीचे पीठ, मैदा, आले-मिरची मिक्सरमध्ये वाटून, हळद, मीठ, ताक आणि २ वाट्या पाणी एकत्र करून छान कालवणे. पिठाच्या गुठळ्या राहता काम नये. 
३. आता हे मिश्रण पिठाच्या चाळणीतून काढून घ्यावे. त्यामुळे ज्या पिठाच्या वड्या करायच्या आहेत त्यात कसलाही चोथा ना राहता ते गुळगुळीत होते. 
४. हे मिश्रण जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉनस्टिकच्या भांड्यात घालून बारीक गॅसवर शिजवायला ठेवणे. हे मिश्रण सतत ढवळत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यात गुठळ्या होणार नाहीत. 
५. हे मिश्रण घट्ट होत आल्यावर त्या भांड्यावर झाकण ठेवून दोन वाफा द्याव्यात.
६. आता हे मिश्रण गरम असतानाच तयार ठेवलेल्या ताटांवर पसरवायचे आहे. पिठाचा पातळ थर असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला उलथणे वापरून आणि नंतर हाताने पसरवायचे आहे. हे करताना हात कोरडा असावा अन्यथा ते पीठ हाताला चिकटू शकते.
७. हे पिठाचे थर लगेच गार होतात. प्रत्येक ताटावर एक चमचा फोडणी पसरावी. तसेच खवलेला नारळ आणि चिरलेली कोथिंबीर पसरावी. 
८. आता ह्याचे सुरीने ५ काप करावेत म्हणजे प्रत्येक ताटावर ५ पट्ट्या तयार होतील. 
९. एकेका पट्टीची काळजीपूर्वक सुरळी करावी. 
१०. ह्या सुरळीच्या वड्या एखाद्या भांड्यात काढाव्यात आणि उरलेली फोडणी तसेच नारळ आणि कोथिंबीर त्यांच्यावर पसरवावी.
टीप:
१. वाफ देणे म्हणजे ज्याला वाफ द्यायची आहे त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवायचे. साधारण १-२ मिनिटांनंतर झाकण उचलून पहिले असता झाकणाच्या खालून वाफा येत असतात. असे असल्यास ही पहिली वाफ दिली असे झाले.
२. १ वाटी बेसन असेल तर २ वाट्या पाणी घालायचे आहे. पाण्यात कालवलेले मिश्रण पातळ असते. Suralichya vadya
Today is my parent’s marriage anniversary. And I decided to wish them in person. When I was working, I usually used to get foodstuff like Dhokala from outside. But this year I thought of making something at home. My father likes suralichya vadya; hence decoded to make the same at home.
For that I had my best friend Deshpande aunty by my side. (Mrs. Deshpande is the writer of a Marathi cookbook ‘Hamkhaas paaksiddhi’ meaning Foolproof cooking. The book was gifted by my sister immediately after my marriage and since then it has been my companion in many of my experiments in cooking. It’s very useful for a novice as well as a seasoned person.)
As I was doing it after many years, I was quite doubtful. Doubtful if I could take it to finish. Doubtful if it would be a successful attempt for me. Doubtful if my parents would like the taste.
Finally kept all the doubts aside and started on a positive note that I will definitely do it well. And yes, I was successful and my parents liked the taste. (Getting praised by my father is a big thing as he himself is a very good cook.)
So here comes the detailed recipe.

Ingredients:
Besan                 – 1 cup
Mazda                – 1 teaspoon
Sour buttermilk – ¾ cup
Ginger                 – 1-inch piece
Green chilli         – 1-2
Turmeric             – ¼ teaspoon
Salt                      – as per your taste
For tadaka:
Oil – 2 tablespoons
Mustard seeds
Cumin seeds
Asafetida
A pinch of turmeric
For garnishing:
Grated coconut – ½ cup
Coriander           – ¼ cup (finely chopped)
**Please keep 3 dinner plates ready clean and dry to spread the batter for suralichi vadi
Procedure:
1. Make the tadaka ready and keep it aside. We have to use it once it cools down.
2. Mix besan, maida, ginger and chilli paste (prepared in mixer-grinder), turmeric, buttermilk, salt and 2 cups of water in a bowl.
3. Mix it well so that there are no lumps of flour in it.
4. Strain the mixture through a flour sieve so that the mixture is smooth.
5. Put this mixture in a thick bottom pan or a non-stick pan on mow flame. Stir it continuously so that no lumps are formed.
6. Once it is thickened a bit, cover the pan so that the mixture is steamed.
7. After 1-2 minutes remove the lid and stir it and cover it again.
8. After another 1-2 minutes, turn off the heating.
9. Start spreading the batter when hot, on the dinner plates that we have kept ready.  Use spatula in the beginning and later to have a thin layer use your hands. Please ensure that your hands are dry else the batter will stick to your hands.
10. The batter dries instantly. Now spread the tadaka – 1 teaspoon on 1 plate along with grated coconut and chopped coriander.
11. Cut these spreads in 5 parts such that you get 5 strips that can be rolled into suralichi vadi.
12. Roll all these strips and transfer them to a bowl. Spread remaining tadaka and grated coconut and chopped coriander on them.
Suralichya vadya are ready to be served.
Tips:
1. For a cup of besan, add 2 cups of water. The consistency of this mixture is watery.

Comments

Popular posts from this blog

उगाच काहीतरी!

माया