Posts

Showing posts from 2013

'माध्यान्न', 'माध्यान', 'माध्यान्य'!...

आजच्या लोकसत्ताच्या आंतरजालीय आवृत्तीमध्ये ही बातमी आहे. बातमीचा सारांश असा आहे की शालेय विद्यार्थ्यांना जे माध्याह्न भोजन दिलं जातं त्यात खाल्लेल्या केकमुळे २०० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. तर ह्या जेमतेम १ ओळींच्या बातमीमध्ये 'माध्याह्न' हा शब्द तीन वेळेस वापरला आहे आणि तीनही वेळेस चुकीचा. एकदा ' माध्यान्न ', नंतर ' माध्यान ' आणि शेवटी ' माध्यान्य '! मध्य + अहन् (दिवस) = माध्याह्न ह्या शब्दाची एवढी चिरफाड फारंच त्रासदायक वाटली.  

मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

नमस्कार! सर्वांना संक्रांतीच्या अनेकानेक गोड शुभेच्छा! तिळगुळाची गोडी आपणा सर्वांच्या आयुष्यात सदैव राहो ही मनोकामना.  तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.... :) **************************************