Posts

Showing posts from May, 2018

हरीच्या नैवेद्याला केली...

Image
हरीच्या नैवेद्याला केली... लहानपणी कायम भोंडल्याला म्हणलेले हे गाणे. तेव्हाही मला खूप आवडायचे आणि आता म्हणत नसले तरी बऱ्यापैकी आठवते. तर हादग्याला अजून बरेच दिवस असताना मधेच का बरे मला हे गाणे आठवावे... तर झाले असे की सकाळी तापवलेले दूध दुपारी तापवले नाही आणि संध्याकाळी तापवायला ठेवायला उशीर झाला. सध्या उन्हाळा इतका निर्मम आहे की ही चूक अक्षम्य ठरली. मग काय, म्हणावे लागले मला "दूध तापवायला झाला उशीर, झाले त्याचे पनीर". आता इतके वर्षे गृहिणीपद सांभाळत असल्याने ते दूध काही टाकून देववेना. मग केला विचार की "ठेवेन त्याला आचेवर मंद आणि करेन त्याचा छानसा कलाकंद". मग काय घेतली लोखंडी कढई आणि पेटवला गॅस अन ओतले ते घट्ट झालेले दूध त्यात आणि ढवळायला चालू लागले माझे हात. त्यात असलेले पाणी आटले आणि मग घातली त्यात थोडी साखर. विरघळली साखर आणि ते मिश्रण सुटू लागले कडेने. अंदाजाने वाटले झाले पुरेसे कोरडे. मग एका ताटलीला तुपाचा हात लावून पसरले त्यात. त्यावर घातले थोडे बदामाचे पातळ काप अन झाला की कलाकंद झ्याक!    तळटीप: १. ही पाककृती म्हणजे बिघडलेले निस्तरायला प्रयत्न असल...