उगाच काहीतरी!
आज आमच्या सोसायटीमध्ये भिशी होती. ज्यांच्याकडे होती त्या काकू साठीच्या पुढच्या आणि पुण्यातील एका प्रयोगशील शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या. त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत. आणि ती खूपच सुंदर आहेत. त्याचबरोबरीने त्यांनी oil pastels वापरून चित्रे काढून त्याला लॅमिनेट करून सुंदर अशी टेबल मॅट बनवली आहेत. त्यांचा तो उत्साह बघून मलाही काही तरी करावेसे वाटले म्हणून घरी आल्यावर लगोलग oil pastels घेऊन चित्र काढायचा प्रयत्न केला. प्रयत्न अगदीच बाळबोध आहे पण तरीही ...