Posts

Showing posts from 2023

कथा - भिंतीवरील चेहरा

रात्रीची जेवणंखाणं उरकून गावातली तमाम मंडळी त्यांच्या नेहमीच्या पारावर येऊन गप्पा मारत बसली होती. आदल्याच दिवशी झालेल्या अमावास्येमुळे विषय अर्थातच भुताखेतांवर न गेला, तरंच नवल होतं. अज्याने त्याच्या मामाने पाहिलेल्या भुताचा काहीतरी एक किस्सा सांगितला, तर सच्याने त्याच्या आजीची गोष्ट सांगितली. तिला एका अमावास्येच्या रात्री विहिरीत उडी टाकून गेलेली त्यांच्या गावची पाटलीण दिसली होती. असं प्रत्येकाचं काही ना काही सांगून झालं होतं. त्यामुळे गप्पांचा जोर कमी होत आला होता. तसं राजूचं लक्ष पाराच्या पलीकडे एका दगडावर बसलेल्या माणसाकडे गेलं. गडी गावचा नाही, हे सहज लक्षात येत होतं. “काय पाव्हणं, कोणाकडे आला?” असं म्हणत राजूने त्याची चौकशी सुरू केली. तशा सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. “मागच्या आळीतल्या वसंताकडे आलोय’ असं त्याने उत्तर दिलं. “मग नाव काय म्हणालात? अन कुठल्या गावचे म्हणायचे तुम्ही?” वसंताचा पाहुणा म्हटला, तशा राजूच्या पुढच्या चौकश्या सुरू झाल्या. “मी मुकुंद. आजच पुण्याहून आलो. वसंता गेलाय शेतावर पाणी द्यायला. घरी बसून काय करायचं, म्हणून थोडं पाय मोकळे करायला बाहेर पडलो.” पाहुण्...

इस मोड से जाते हैं .... (२)

Image
मुली पहिल्यापासून ह्याच शाळेत असल्याने बऱ्याचश्या शिक्षिकांना मी ओळखत होते तसेच त्याही मला ओळखत होत्या. धाकटीच्या दहावीच्या वर्षात PTA मेंबर म्हणून शाळेत अजूनच येणं-जाणं झालं होतं. पण ३ एप्रिलला जेव्हा शाळेत जाणार होते, तेव्हा टेबलावर ज्या शिक्षकांच्या समोर बसत होते त्यांच्या पंक्तीत बसायचं होतं. नाही म्हटलं तरी थोडी धाकधूक होती. तिथल्या शिक्षिका माझ्या नवीन भूमिकेचा कितपत सहजतेने स्वीकार करतील असं वाटत होतं. पण खरं सांगू मनातली ही शंका क्षणात दूर व्हावी एवढ्या सहजासहजी त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं.  गंमत म्हणजे शाळेतल्या काम कित्येक मावशींनी पण मला ओळखलं. कोणासाठी मी मोठीची आई होते तर कोणासाठी धाकटीची.    मी फक्त नववी आणि दहावीच्या वर्गांना शिकवणार असल्याने, नववी आणि दहावीच्या शिक्षकांच्या स्टाफरूममध्ये मला जागा मिळाली. आणि इतके दिवस श्रावणी आणि तन्वीची आई असलेली मॅम त्यांच्यासाठी शर्वरी झाले. काहीजणी लगेचच अगं-तुगं म्हणायला लागल्या. तर काही जणी अहो-जाहो करत असल्या तरी एक सहकारी म्हणून मैत्र जपत होत्या. शाळेची मधली सुट्टी सकाळी ९:३० वाजता व्हायची. सगळ्य...

इस मोड से जाते हैं .... (१)

Image
आपल्या आयुष्याची वाटचाल सुरु असताना अशी काही वळणं येतात की स्वप्नातही कल्पना न केलेला रस्ता आपण चालायला लागतो. बापरे, काही गहन तत्त्वज्ञान सांगण्यासाठी केलेला हा पोस्टप्रपंच तर नाहीये ना! तर तसं काही नसून एका अनुभवाची ही गोष्ट आहे. आणि गोष्ट सांगताना ती रंगतदार करायची असेल तर नमनाला घडाभर तेल ओतणे आले. माझ्या मुलींची शाळा सुरु झाल्यावर सुरुवातीच्या काळात parents-teacher मीटिंगला लोकांना एवढे काय प्रश्न पडतात आणि शिक्षकांशी एवढं काय बोलायचं असतं अशी प्रश्न पडणारी मी. आणि मागच्या वर्षी तन्वी दहावीला असताना PTA मेंबर होऊन शाळा आणि पालकांमधील दुवा होणारी मी, असा माझा पालकत्वाचा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासात शाळेला - त्यांच्या प्रशासनाला येणाऱ्या अडचणी पण लक्षात आल्या. त्यातीलच एक म्हणजे कधी कधी काही कालावधीसाठी शिक्षक उपलब्ध नसणे. त्यामुळे शाळेतील शेवटची PTA मीटिंग झाली तेव्हा मी शाळेत सांगून आले होते की शिक्षकांबद्दल काही अडचण असेल तर मी काही कालावधीसाठी मदत करू शकेन. आणि नवीन सत्राची शाळा सुरु झाल्यावर खरंच त्यांच्या एक शिक्षिका २ आठवड्यांनी जॉईन होणार होत्या. त्यामुळे त्यांची जागा भरून ...