साखरभात
काल अनंत चतुर्दशी झाली . आमच्या घराच्या गणपतीचं विसर्जन झालं. त्यामुळे सकाळी नैवेद्याला गोड काय करावं हा विचार चालू होता कारण गणेश चतुर्थीला मोदक करून झाले होते. मग विचार केला की साखरभात करावा. (मागे एकदा केला तेव्हा फसला होता. त्यामुळे ह्या वेळेस करा टेन्शन होतं.) तरी पण ह्या वेळेस केलेला प्रयोग बराच यशस्वी झाला म्हणून म्हणाला की मी केली पाक-क्रिया सर्वांना सांगावी. तर त्यासाठी लागणारे किंवा मी वापरलेले जिन्नस आहेत: तांदूळ - १ १/२ वाटी साखर - तांदळाच्या दीड पट लवंगा - ३-४ बदामाचे काप बेदाणे वेलदोड्याची पूड केशर लिंबू - १/२ तूप कृती: १. सर्वात प्रथम तांदूळ (मी कोलम वापरले) निवडून स्वच्छ धुवून किमान अर्धा तास निथळत ठेवावेत. २. जाड बुडाच्या कढईत २ चमचे साजूक तूप घालावे आणि त्यात लवंगा घालून त्यात तांदूळ परतावेत. ३. तांदूळ थोडे परतले गेले की त्यात गरम पाणी घालावे. पाण्याचे प्रमाण कुठला तांदू...