साखरभात
- Get link
- X
- Other Apps
काल अनंत चतुर्दशी झाली. आमच्या घराच्या गणपतीचं विसर्जन झालं. त्यामुळे सकाळी नैवेद्याला गोड काय करावं हा विचार चालू होता कारण गणेश चतुर्थीला मोदक करून झाले होते. मग विचार केला की साखरभात करावा. (मागे एकदा केला तेव्हा फसला होता. त्यामुळे ह्या वेळेस करा टेन्शन होतं.) तरी पण ह्या वेळेस केलेला प्रयोग बराच यशस्वी झाला म्हणून म्हणाला की मी केली पाक-क्रिया सर्वांना सांगावी.
कृती:
तर त्यासाठी लागणारे किंवा मी वापरलेले जिन्नस आहेत:
तांदूळ - १ १/२ वाटी
साखर - तांदळाच्या दीड पट
लवंगा - ३-४
बदामाचे काप
बेदाणे
वेलदोड्याची पूड
केशर
लिंबू - १/२
तूप
कृती:
१. सर्वात प्रथम तांदूळ (मी कोलम वापरले) निवडून स्वच्छ धुवून किमान अर्धा तास निथळत ठेवावेत.
२. जाड बुडाच्या कढईत २ चमचे साजूक तूप घालावे आणि त्यात लवंगा घालून त्यात तांदूळ परतावेत.
३. तांदूळ थोडे परतले गेले की त्यात गरम पाणी घालावे. पाण्याचे प्रमाण कुठला तांदूळ वापरतो ह्यावर ठरते. कोलम साठी दुअप्ती पेक्षा जास्त म्हणजे जवळ जवळ अडीच पट पाणी लागते.
४. पाण्याला उकळी आली की सध्या कुकर मध्ये भात मोकळा शिजवून घ्यावा. मी इलेकट्रीकल कुकर मध्ये शिजवून घेतला.
५. भात शिजल्या नंतर पराती मध्ये मोकळा पसरवून गार करण्यास ठेवावा.
६. जाड बुडाची कढई अथवा पातेल्यामध्ये साखर आणि साधारण एक वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावे. पाक चांगला घट्ट, ज्याला गोळीबंद म्हणता येईल असा, बनवायचा आहे.
७. गार झालेल्या भातामध्ये केशराची पूड, काजू-बदामाचे काप, बेदाणे आणि वेलदोड्याची पूडहे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यावे. आवडत असल्यास खायचा केशरी रंग सुद्धा वापरता येतो.८. साखरेचा पाक करायला ठेवलेला gas बंद करून मग त्या मध्ये तयार भात घालावा. ते सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र ढवळावे.
९. आणि पुन्हा gas सुरु करून अत्यंत मंद आचेवर भात खाली लागण्याची शक्यता असल्याने आधी तवा ठेवून त्यावर भाताचे पातेले/कढई ठेवावी.
१०. भाताला २ - ३ वाफा आणाव्यात.११. जर पाक पुरेसा घट्ट झाला नाही तर भात घातल्यानंतर मिश्रण पातळ होते आणि आळून येण्यास वेळ लागतो. (मी ह्या वेळेस ही चूक केली आणि पुढच्या वेळेस नक्की टाळणार आहे.)
हा असा दिसतो तयार साखरभात...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment