धागा एक रेशमाचा
होते उभी एकटी खोल डोहाच्या काठाशी अथांग खोली त्याची होती ओढत तळाशी डोहाकाठची मी, हे चित्र दिसत होते सुखद मलाच होती ठाव माझी आंदोलने दुःखद लाटेने पुसावे वाळूतील रेषेस जैसे वाटे नष्ट होईल माझे अस्तित्व तैसे खेचले डोहापासूनी काळ्या असा धागा एक रेशमाचा अन् दिला त्याने अर्थ नवा जीवनाचा