अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून माझी मोठी मुलगी आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते. आम्ही दोघी वेगवेगळ्या भागात पुस्तके पाहत होतो. तेवढ्यात तिथल्या तिथेच मला माझ्या मुलीचा फोन आला. ती जिथे होती तिथे ती मला बोलावत होती. झालं असं की ती तिथे पुस्तकं पाहत असताना, तिथे आलेल्या इतर काही जणी चित्कारल्या 'ई.. हे बघ Mills & Boon!' आणि माझ्या मुलीला तिथे Mills & Boon च्या पुस्तकांचा ढीग दिसला. तो पाहताच तिने मला लगोलग फोन केला. मी तिथे गेले आणि अत्यानंदाने दोन पुस्तके घेऊनच टाकली. काहींना Mills & Boon हे प्रकरण काय आहे हे माहीत नसेल म्हणून सांगते. रोमँटिक कथांची ही पुस्तके असतात. दर पुस्तक वेगळ्या लेखिकेचं ...
तर आंतरजालावरच्या एकूण वावरातून असं निदर्शनास आले आहे की पदार्थ काहीही असला तरी नाव आणि फोटो दिलखेचक असले पाहिजेत. त्यामुळे हे नाव. त्यातले घटक पदार्थ काय आहेत हे वाचून तुम्हालाही हे लक्षात येईल. तर सर्वात प्रथम आपण घटक पदार्थ काय आहेत ते बघू. कणिक आदल्या रात्रीची पालक, मेथी आणि चुक्याची पातळ भाजी लसणाच्या दोन पाकळ्या थोडी जिरे पूड हळद तिखट मीठ कृती: सर्व घटक पदार्थ एकत्र करून आणि अगदी गरज लागेल तसे पाणी मिसळून गोळा मळून घ्या. तेलाचा हात लावून १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. आता लहान लहान गोळे करून पराठे लाटून घ्या आणि खरपूस भाजून घ्या. आवडीप्रमाणे चटणी, लोणचे अथवा सॉस ह्यांच्या सोबत ह्या पराठ्यांचा चट्टामट्टा करा. इथे मी चटणी वाढली आहे. चटणी घरचीच आहे पण सोलापूरच्या खैरमोडयांच्या! 😀 तर साहित्य आणि कृती वाचून नावाचा उलगडा झालाच असेल. आणि नसेल तर आता सांगते. उसू पराठा म्हणजे उरलेसुरल्याचा पराठा!
अश्याच एका शांत दुपारी होते निरभ्र आकाश अन् पाहता पाहता आले मळभ दाटून जुन्या आठवणींचा जणू तळ आला ढवळून चहू दिशा अंधारल्या जीव गेला घाबरून वाटे येईल आता सोसाट्याच्या वारा जाईल झोडपून आसमंत सारा पण पाहते तो काय केवळ होत्या संततधारा आला होता भीज पाऊस चिंबवून गेला भोवताल सारा!
Comments
Post a Comment