while(1)
Programming मधे (मला फक्त C programming येतं त्यामधे तरी निदान ) वेग-वेगळी loops असतात. त्यातलंच एक while loop. तर जेव्हा वरील दिल्या प्रमाणे (while (1)) loop असते तेव्हा त्याला infinite loop म्हणतात. एकदा ते loop चालू झाले की आपण काही conditon देऊन ब्रेक केल्या शिवाय ते ब्रेक होत नाही. तसच आपल्या मनाचं पण होतं बर्र्याचदा... एकदा एका विचारत अडकले की त्यातून काही केल्या बाहेर येत नाही. आपल्याला काळात असतं की ह्यातून बाहेर पडायला पाहिजे पण ती ब्रेक contition काही केल्या execute होतंच नाही. आपलं मनाचं प्रोग्राम्मिंग काही तरी चुकतं बहुतेक! त्या लूपच्या बाहेर कित्येक चांगल्या गोष्टी असतात. पण मन मात्र नको त्या गोष्टींचा विचार करत आपली सगळी शक्ती त्यात खर्ची करत बसतं... आपल्या कामात जेव्हा एखादी functionality implement करायची असते तेव्हा आपण किती गोष्टी करतो. वेग-वेगळी डिजाईन docs. प्रत्येक error contition साठी check आणि आप...