- Get link
- X
- Other Apps
माझी ऑफिस मधे एक मैत्रिण आहे तिचा एक ब्लॉग आहे. तसा म्हणला तर बरच अलीकडे तिने ब्लॉग्गिंग सुरु केला आहे. आणि ती मला कायम सांगत असते की मी एक feedjit नावाचे gadget traffic बघण्यासाठी वापरत आहे आणि अमुक प्रकारचे लोक विसित करत आहे असा ती मला कायम उत्साहात सांगत असते. तेव्हा तिचा कौतुक अवश्य करत असते. पण जेव्हा माज्या ब्लॉग वर माझ्या व्यतिरिक्त इतर visitor जेव्हा मी पाहिला/पाहिली तेव्हा मला कोण आनंद झाला!
ह्या ब्लॉग मुले पुन्हा एकदा लहान झाल्याचा आनंद मिळत आहे. लहानपणी कसा काहीही नविन गोष्ट केली की इतरांनी ती किमान पहावी आणि कौतुकही करावा. आताही अगदी असच वाटत आहे. आता फरक फक्त एवढा आहे की निदान इतरांनी हा ब्लॉग पहावा तरी ही अपेक्षा... :)
हा आनंद साजरा करण्यासाठी ही पोस्ट. बघूयात अजून काय कारणास्तव नविन नविन पोस्ट लिहायच्या ते...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment