सरळ रेष
- Get link
- X
- Other Apps
आधी सांगितले तसे हौसेने drawing क्लास चालू केला आहे. तर असच एका क्लास मधे दाराच्या चौकटीला टेकून उभ्या असलेल्या बाईचे चित्र काढायचे होते. आधी बाई काढली आणि मग चौकट काढायची होती. ही सगळी चित्रकला freehand. तर अशी ही चौकट बिन पट्टीची काढली. माझी शिक्षिका जिला मी ताई म्हणते ती मला म्हणाली ‘अरे वा! बिन पट्टीची छान सरळ रेष काढली आहेस’. तर माझे उत्तर होते की सरळ रेष draw करणे सोप्पे झाले आहे. त्या पेक्षा वेगले आकार किंवा गोलाई काढने फार अवघड जाते. असो.
तर मुद्दा हा आहे की चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता सरळ रेषेची इतकी सवय झाली आहे की त्याच्या पलिकडे जाऊन वेगले आकार, वेगले विचार करणे अवघड जात आहे.
काही लेखन करायला जावे तरी एकदम concise. आपण शाळेत असताना कसे मराठीचा पेपर म्हणला की छान विस्तृत उत्तरे लिहायची आणि शास्त्र म्हणला की मुद्द्यांमधे उत्तरे लिहायची. आता मात्र असे काही विस्ताराने लिहिणं इतकं अवघड जातं ना…
आता सुद्धा लिहायला घेतलं खरं पण असं वाटतंय की मला जे सांगायचं आहे ते सांगून झालं आहे की! मग आता पाल्हाळ कशाला लावायचं. पण हेच जमत नाहिये की नलातली controlled धारेपेक्षा धबधबा जास्त मनोहारी असतो. (आता हे असलं वाक्य लिहिलं की असं वाटतंय की किती पुस्तकी वाक्य लिहिलंय मी… :P)
तर सारखे सावाधानतेत जगायची सवय लागली आहे. मोकले स्वच्छंदी वागायची भीतीच वाटते. त्या सरळ रेषेच्या बाहेर जायची भीती वाटते. सारखं वाटत राहतं की आपण असं केलं तर आपलं काही चुकेल का? कोणी आपल्याला काही म्हणेल का?
पडता येईल का मला ह्या सरळ रेषेच्या बाहेर!!!!
- Get link
- X
- Other Apps
I like it......written very true to the point.
ReplyDelete