सुरळीच्या वड्या
सुरळीच्या वड्या आज माझ्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्यामुळे त्यांना भेटायला जायचे होते. इतके वर्ष नोकरी करत असताना कायम बाबांना आवडतात म्हणून बाहेरून ढोकळे वगैरे घेऊन जायचे. पण आज ठरवले की आपण स्वतः करून न्यावे. बाबांना आवडते म्हणून सुरळीची वडी करावी असे ठरवले. मदतीसाठी हमखास पाकसिद्धीच्या देशपांडे काकू होत्याच. (हमखास पाकसिद्धी हे एक पुस्तक पाककृतींचे मराठीतील पुस्तक आहे. माझ्या बहिणीने मला लग्न झाल्या झाल्या भेट म्हणून दिले होते. माझं फार आवडतं पुस्तक. कारण त्यात नवशिक्यांसाठी व्यवस्थित प्रमाण दिलेले आहे. त्याचबरोबर कृतीसुद्धा अगदी मुद्देसूद आहेत. आणि टीपांमध्ये काही युक्त्या आणि काय चुका होऊ शकतात हेही दिलेलं आहे. काहीकाही ठिकाणी चुका कश्या निस्तरायच्या हेही दिले आहे. अरे बापरे! मी तर पुस्तकाचे परीक्षणच सुरु केले.) पुन्हा मुद्द्याचं बोलते. तर कित्येक वर्षांमध्ये केलेली नसल्याने प्रचंड भीती वाटत होती. मग काय सुरु केलं मी "शुरु करें सुरळीची वडी, लेके प्रभू का नाम". म्हणलं 'म' आलं म्हणजे मस्तंच होणार वडी. आणि एवढं आवर्जून आईबाबांसाठी करत आहे म्हणल्या...