भीज पाऊस



अश्याच एका शांत दुपारी
होते निरभ्र आकाश
अन् पाहता पाहता आले मळभ दाटून
जुन्या आठवणींचा जणू तळ आला ढवळून

चहू दिशा अंधारल्या
जीव गेला घाबरून
वाटे येईल आता सोसाट्याच्या वारा
जाईल झोडपून आसमंत सारा

पण पाहते तो काय
केवळ होत्या संततधारा
आला होता भीज पाऊस
चिंबवून गेला भोवताल सारा!

Comments

  1. Replies
    1. प्राची, आवर्जून कविता आवडल्याचा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल!

      Delete
  3. Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!

      Delete
  4. Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)