पोलीसमामा
 आज ऑफिस मधून निघाल्यावर खूप दमल्यासारखा वाटत होतं. आणि तरीही काही काम  पूर्ण झालंय असं वाटत नव्हतं. Performance  measurement  साठीचं self  -assessment  manager  ने आज पर्यंत भरून ठेवायला सांगितलं होतं ते पण झालं  नव्हतं.  अगदी कंटाळून गेल्यासारखं झालं होतं.       मग घरी यायला निघाले तर युनिवर्सिटी सर्कल पाशी पोहोचल्या पोचल्या सिग्नल  लागला. त्यामुळे गाडी सर्वात पुढे होती. जवळ जवळ २ मिनिटांचा सिग्नल  असल्याने मग गाडी बंद करून निवांत इकडचं तिकडचं निरीक्षण चालू होतं. आणि  आमचा सिग्नल सुटायला जेमतेम ४० सेकंद उरले असतील आणि औंध रस्त्याने शिवाजी  नगर कडे जाणारा एक टेम्पो अचानक उजवीकडे पाषाण रोडला जाण्यासाठी वळला. आणि  युनिवर्सिटीच्या गेटच्या बाहेर ट्राफिक पोलीस होते. त्यांनी त्या टेम्पोला  थांबवण्यासाठी हात केला. परंतु तो टेम्पो न थांबता पुढे जाऊ लागला. मग  त्यांच्यात एक इन्स्पेक्टर होता तो पळत त्या टेम्पोच्या मागे जाऊ लागला.  तसे युनिवर्सिटी गेट ते पाषाण रोडची बाजू बरेच अंतर आहे. आणि ती   इन्स्पेक्टर तसा बराच सुदृढ होता. पण त्याने पळत पळत जाऊन त्या टेम्पोला  गाठले आणि त्याला ...