२-३ वर्षांपूर्वी 'Sunday' नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला. आयेशा टाकिया, अजय देवगण, अर्शद वारसी असे कलाकार होते. मी तो पिक्चर टीव्हीवरंच बघितला होता. मला खूप आवडला. कदाचित तो नेहमीप्रमाणे एखाद्या इंग्लिश पिक्चरची कॉपी असेलसुद्धा. पण म्हणतात न की अज्ञानात सुख असतं. तसंच मी फारसे इंग्लिश पिक्चर बघत नसल्याने मला काही कळलं नाही की तो पिक्चर ओरिजिनल आहे कि कॉपी. पण मनाला आनंद देऊन गेला हे निश्चित. तर आज ह्या पिक्चरची आठवण व्हायचं कारण म्हणजे त्या पिक्चरमध्ये जसं आयेशा टाकियाच्या आयुष्यातला फक्त एक रविवार पुसला जातो त्याप्रमाणे माझ्या ऑफिसच्या आयुष्यातले काही महिने पुसले गेले. अर्थात तिच्या आयुष्यातून एक रविवार पुसला जाण्याचं कारण वेगळं होतं आणि माझ्या आयुष्यातले काही महिने पुसले जाण्याचं कारण वेगळं होतं. तर सध्या मी एकदम नॉस्टॅल्जिक मूडमध्ये असल्याने अश्याच अधूनमध...