एक विनोद
आई आणि बाबा त्यांच्या ४ वर्षांच्या मुलीबरोबर भारताची क्रिकेटची मॅच बघत असतात. मैदानात राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर असतात.
आई: द्रविडला अजिबात पोट नाहीये ना!
बाबा: तो काय इतर कोणत्याच खेळाडूंना पोट नाहीये.
मुलगी: म्हणजे त्याला फक्त पाठ आहे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
=========================================================================
सदर विनोद आमच्या घरात आज सकाळी लाईव्ह घडला आहे. आम्ही जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चाललेली क्रिकेटची मॅच बघत होतो तेव्हा मी जेव्हा द्रविडला अजिबात पोट नाहीये असं म्हटलं तेव्हा हा प्रश्न माझ्या ४ वर्षांच्या मुलीला पडला. आणि त्यातून ह्या विनोदाची निर्मिती घडली. :)
Comments
Post a Comment