Sunday Syndrome
२-३ वर्षांपूर्वी 'Sunday' नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला. आयेशा टाकिया, अजय देवगण, अर्शद वारसी असे कलाकार होते. मी तो पिक्चर टीव्हीवरंच बघितला होता. मला खूप आवडला. कदाचित तो नेहमीप्रमाणे एखाद्या इंग्लिश पिक्चरची कॉपी असेलसुद्धा. पण म्हणतात न की अज्ञानात सुख असतं. तसंच मी फारसे इंग्लिश पिक्चर बघत नसल्याने मला काही कळलं नाही की तो पिक्चर ओरिजिनल आहे कि कॉपी. पण मनाला आनंद देऊन गेला हे निश्चित.
तर आज ह्या पिक्चरची आठवण व्हायचं कारण म्हणजे त्या पिक्चरमध्ये जसं आयेशा टाकियाच्या आयुष्यातला फक्त एक रविवार पुसला जातो त्याप्रमाणे माझ्या ऑफिसच्या आयुष्यातले काही महिने पुसले गेले. अर्थात तिच्या आयुष्यातून एक रविवार पुसला जाण्याचं कारण वेगळं होतं आणि माझ्या आयुष्यातले काही महिने पुसले जाण्याचं कारण वेगळं होतं.
तर सध्या मी एकदम नॉस्टॅल्जिक मूडमध्ये असल्याने अश्याच अधूनमधून वेगवेगळ्या आठवणी येत आहेत. त्यामुळे ही गोष्ट आठवली आणि विचार केला की एकदा कागदावर (वर्च्युअल का होईना) उतरवावी. असो.
झालं काय की माझ्या दुसर्या कन्येच्या वेळेस मी ७ महिन्यांची मॅटर्नीटी लीव्ह घेतली होती. आणि ती सुट्टी २००७ वर्षाखेरीला चालू झाली आणि २००८ मध्ये पुन्हा ऑफिस जॉईन केलं. तो ऑफिसमधला काळ माझ्यासाठी पॉझ झाला होता. आणि मी पुन्हा ऑफिसला येऊ लागले तेव्हा ते नुसतंच रेझ्युम होतं.
त्यामुळे मी जेव्हा आधीच्या वर्षाबद्दल बोलायची तेव्हा ते माझ्यासाठी २००६ असायचं. आणि पुढचं वर्षं २००७ असायचं. तो काळ फार गंमतशीर होता. जेव्हा जेव्हा पुढच्या किंवा मागच्या तारखांचा संदर्भ द्यायची वेळ यायची तेव्हा मला माझ्या मेंदूला बराच ताण द्यावा लागायचा. असो.
पण म्हणतात ना की सगळ्या गोष्टींचं औषध 'काळ' हेच असतं. तसंच मधली ३-४ वर्षं गेली आणि त्या 'Sunday Syndrome' मधून बाहेर आले.

Well, got such a nice blog to read.
ReplyDeleteAll of ur posts are very much desirable.
The way u write in Marathi is very gratifying.
Thanks & Keep writing.
धन्यवाद!
ReplyDelete