शहरात रुजताना

परवा रविवार सकाळच्या  - सप्तरंग पुरवणीमध्ये 'महानगरात रुजताना' नावाचा लेख पाहिला. बहुधा वर्षभर चालणारी लेखमाला असावीतो लेख वाचून मला आम्ही पुण्यात राहायला आलो ते दिवस आठवू लागले. साधारण २३-२४ वर्षे झाली आम्हाला इथे येऊन. पुणं  अजून एक शहरंच होतं आणि त्याचं महानगरात रुपांतर झालं नव्हतं. त्यामुळे विचार केला की आपण पण आपला पुण्यात नवीन असतानाच अनुभव इथे लिहावा. 

वडिलांची नोकरी बदलीची होती. त्यामुळे दर वर्षांनी नवीन गावी बदली. आणि साधारण तालुक्यांच्या गावी बदली होत असेमाझी सर्वात मोठी बहिण साधारण दहावीत वगैरे असताना आईने बाबांच्या मागे लागून पुण्यामध्ये घर बुक करायला लावलंआणि तिची बारावी झाल्यावर आम्ही आमचं कुटुंब पुण्यात हलवलंबाबा बदलीच्या ठिकाणी आणि आम्ही पुण्यात अशी द्विस्थळी  यात्रा होती.

तेव्हा मी सहावीत गेले होते. नवीन आमच्या भागातल्या प्रथितयश शाळेत प्रवेश घेतला. आमची शाळा मुला-मुलींची असली तरी मुलींची शाळा सकाळी आणि मुलांची दुपारी असा प्रकार होता. त्यामुळे ६०-६२ नुसत्या मुलीच्या वर्गात उंचीमुळे मला एकदम शेवटचा बेंच मिळाला. माझी शेजारीण एक वर्ष नापास होवून पुन्हा त्याच वर्गात बसली होती. नवीन असल्यामुळे आणि लहान गावातून आलेली असल्यामुळे अर्थातच कोणी माझ्याशी बोलत नव्हतं.

आणि अजून त्यात एक गंमत झाली. मराठी शाळांमध्ये मुलींना फी माफ असते. पण जर ती मुलगी नापास झाली असेल अथवा घरात चौथे अपत्य असेल तर फी माफी नसते. मी घरात चौथं अपत्य असल्याने मला फी माफी नव्हती. त्यामुळे फक्त मला आणि माझ्या शेजारणीला (नापास झाल्याने) फी भरावी लागत होती. इतर मुलींना मला फी का भरावी लागते ह्या गोष्टीची कल्पना नसल्याने त्यांना माझ्या बाबतीत अजून संशय येऊन त्यांनी माझ्याशी बोलणं अजूनच टाळलंअसो.

असेच काही दिवस गेले आणि आमची पहिली चाचणी परीक्षा झाली. त्याचा निकाल लागला आणि शाळेत स्टँडर्ड हुशार मुला-मुलींना मार्क्स मिळतात तसे मार्क्स मिळाले. आणि त्यानंतर माझ्या वर्गातल्या मुलींनी माझ्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली.

कशी गंमत आहे ! एखाद्या ठिकाणी आपली पाळे-मुळे रोवण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी सिद्ध कराव्या लागता नाही

Comments

  1. नमस्कार,

    पोस्ट आवडली. एव्हाना तुळशीबागेत जाऊन आला असालच. पाळे-मुळे रोवण्यासाठी ती एक आवश्यक गोष्ट आहे पुण्यात.

    शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. तुळशीबागेत चक्कर मारणे हे नुसते पुण्यात पाळे-मुळे रोवण्यासाठी लागते असे नव्हे. तर तो अधून मधून घ्यायचा बूस्टर डोस असतो. :) असो.
    पोस्ट आवडली आणि तसे आवर्जून सांगितले त्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. Chhan lihita aapan :)
    Keep writing.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)