कोरडे पाषाण

माझी मोठी मुलगी जरा चिडखोर आहे. म्हणजे ती तिच्यासमोर घडलेली, बोललेली प्रत्येक गोष्ट मनावर घेते. आणि मग चिडणे, रडणे, रुसून बसणे चालू होते. आणि मग अश्या प्रसंगी कायम तिची समजूत काढावी लागते. 

अश्या वेळेस मी तिला कायम सांगत असते की समोरची व्यक्ती काय बोलते किंवा कशी वागते हे आपल्या हातात अजिबात नसते. पण आपण ह्या सर्वांना काय प्रतिक्रिया द्यायची हे नक्कीच आपल्या हातात असते. (मला वाटतंय की बहुतेक सगळ्यांना ती एक मेल नक्कीच आली असेल की आपल्याला होणारं सुख किंवा दुःख ह्यासाठी सभोवतीची परिस्थिती केवळ १०% कारणीभूत असते आणि उरलेले ९०% आपण परीस्थितीला काय प्रतिक्रिया देतो हे!) पण काय आहे न की अजून ती लहान आहे त्यामुळे मी सारखं सांगत राहते आणि ती पुढच्या वेळेस तिला जसं वागायचं तसं वागत राहते. असो.

तर आज ह्या गोष्टीची आठवण यायचा कारण म्हणजे. सकाळी अशीच एक घटना घडली. कोणी तरी काही तरी बोललेले मला कळले आणि मला खूप दुःख झालं. गंमत कशी आहे ना की कोणी तरी काही तरी कधी तरी बोलून गेलंय जे मला आज कळलंय. म्हणजे माझा अजिबातच कंट्रोल नाही. तरी मी वाईट वाटून घेत बसले.
आता मग ह्याला काय म्हणायचं! 

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)