मोगरा फुलला

आज आमच्या मोगर्‍याच्या झाडावर पहिलं फूल उमललं. कोण कौतुक मला त्याचे!
'मोगरा' माझं अत्यंत आवडीचं फूल म्हणून हौसेने रोप आणले. आज लावू, उद्या लावू करत चालढकल करत राहीले. आणि एक वेळ अशी आली की वाटलं आता हे रोप आपण लावलं तरी रुजणार नाही. अश्याच साशंक मनाने ते रोप लावलं, खतपाणी घातलं आणि उत्सुकतेने ते तगतंय का बघू लागले. आणि खरोखर ते रुजलं आणि त्याच्यावर आज हे फूल उमललं.



जणू हे फूल मला सांगतंय की तुझ्या आवडीच्या गोष्टींची रोपं जळून जाऊ देऊ नकोस. थोडा वेळ आणि भरभरून प्रेम दे. तीही अशीच फुलांनी बहरतील.

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा