फोटोफ्रेम आणि बुकमार्क
- Get link
- X
- Other Apps
माझ्या ऑफिस मध्ये नाताळच्या आधी 'सिक्रेट सांता' म्हणून उपक्रम होता. म्हणजे ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी नावे नोंदवायची. आणि मग प्रत्येकाचं नाव लिहून चिठ्ठ्या बनवायच्या. त्या चिठ्ठ्या टाकून सहभागी असलेल्या प्रत्येकाला चिठ्ठी उचलायला सांगायची. (माझं ऑफिस लहान आहे आणि सहभागी होणारे अजून कमी त्यामुळे ही साधी सरळ पद्धत!) चिठ्ठीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव येईल त्या व्यक्तीसाठी आपण सांता बनून भेटवस्तू द्यायच्या. अर्थात त्या व्यक्तीला समजू न देता. एक प्रकारची गंमत 'Team Building' साठी.
तर माझ्याच बरोबर काम करणारा रणजीत माझ्या अगदी शेजारच्या जागेवर बसतो आणि आम्हा दोघांचं बरंच जमतं. अगदी १४ वर्षांची generation gap असूनही. तर ह्या खेळात त्याने आणि मी दोघांनीही भाग घेतला होता. चिठ्ठ्या टाकायच्या वेळेस मला तो म्हणे 'Please you be my Santa'. म्हटलं की हे आपल्या हातात कुठे आहे! तर चिठ्ठ्या टाकल्या आणि मी चिठ्ठी उचलली तर नेमकं रणजीतचंच नाव आलं.
मग त्याला काय भेटवस्तू द्यायच्या ह्याचा विचार सुरु झाला. ऑनलाईन काही मिळते का बघितले पण काही आवडेना. मग विचार केला की आपण स्वतः काही करून दिलं तर! आणि मग त्याच्या साठी म्हणून एक फोटो फ्रेम आणि बुकमार्क बनवला. कित्येक वर्षांनी असे काही करताना मला खूपच आनंद मिळाला त्यालाही मी दिलेल्या भेटवस्तू आवडल्या.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment