चॉकोलेट चिप कुकीज (कढईमधे)
साहित्य: १. मैदा १ कप २. पिठी साखर १/३ कप ३. जाड पोहे किंवा ओट्स २ चमचे ४. लोणी(घरी तयार केलेले किंवा अनसॉल्टेड बटर) १/२ कप ५. खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा) १/८ टी स्पून ६. मीठ चिमूटभर ६. चॉकोलेट चिप्स किमान १/४ कप कृती: १. लोणी फ्रिजबाहेर काढून ठेवलेले असावे. एका खोलगट भांड्यात लोणी आणि पिठी साखर एकत्र करावी. आणि बीटरने चांगले एकजीव करून घ्यावे. इलेक्ट्रिक बीटर असेल तर लवकरात हे मिश्रण एकत्र आणि मऊसूत होते. २. ओट्स किंवा जाड पोहे कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी. ३. बारीक चाळणीने मैदा, सोडा आणि मीठ हे साहित्य एकत्र एका वेगळ्या ताटात चाळून घ्यावे. ४. क्रमांक ३ च्या पायरीतील पदार्थ आणि बारीक केलेली पोहे/ओट्सची पूड लोणी आणि पिठी साखरेचे जे तयार मिश्रण आहे त्यात एकत्र करावेत. आणि बीटरने पुन्हा सर्व पदार्थ एकजीव करावेत. ५. आता ह्या सर्व पदार्थांचा मऊसूत गोळा तयार होईल. ह्यात चॉकोलेट चिप्स घालून अलगद एकत्र करावे. ६. आता ह्याचे १२ एकसारखे गोळे करून घ्यावेत. ७. दरम्यान कढई गॅसवर मध्यम आचेवर १० मिनिटांपर्यंत तापायला ठेवावी. (कढई प...