चॉकोलेट चिप कुकीज (कढईमधे)

साहित्य:
१. मैदा १ कप
२. पिठी साखर १/३ कप
३. जाड पोहे किंवा ओट्स २ चमचे
४. लोणी(घरी तयार केलेले किंवा अनसॉल्टेड बटर) १/२ कप
५. खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा) १/८ टी स्पून
६. मीठ चिमूटभर
६. चॉकोलेट चिप्स किमान १/४ कप
 


कृती:
१. लोणी फ्रिजबाहेर काढून ठेवलेले असावे. एका खोलगट भांड्यात लोणी आणि पिठी साखर एकत्र करावी. आणि बीटरने चांगले एकजीव करून घ्यावे. इलेक्ट्रिक बीटर असेल तर लवकरात हे मिश्रण एकत्र आणि मऊसूत होते.
२. ओट्स किंवा जाड पोहे कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी.    
३. बारीक चाळणीने मैदा, सोडा आणि मीठ हे साहित्य एकत्र एका वेगळ्या ताटात चाळून घ्यावे.
४. क्रमांक ३ च्या पायरीतील पदार्थ आणि बारीक केलेली पोहे/ओट्सची पूड लोणी आणि पिठी साखरेचे जे तयार मिश्रण आहे त्यात एकत्र करावेत. आणि बीटरने पुन्हा सर्व पदार्थ एकजीव करावेत.
५. आता ह्या सर्व पदार्थांचा मऊसूत गोळा तयार होईल. ह्यात चॉकोलेट चिप्स घालून अलगद एकत्र करावे.
६. आता ह्याचे १२ एकसारखे गोळे करून घ्यावेत.
७. दरम्यान कढई गॅसवर मध्यम आचेवर १० मिनिटांपर्यंत तापायला ठेवावी. (कढई पातळ बुडाची असेल तर गॅस बारीक ठेवावा.)
८. केकच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून घ्यावे.
९. कुकीजसाठी केलेले गोळे हातावर किंचित थापून घ्यावेत.
१०. केकच्या भांड्यात जरा अंतर ठेवून ते थापलेले गोळे ठेवावेत. (भाजल्यावर कुकीज पसरतात.) सर्व कुकीज एकत्र मावत नसतील एकापेक्षा जास्त बॅचेस मध्ये कुकीज बेक करायचे काम करावे.
११. कढईवर झाकण ठेवून बारीक ते मध्यम आचेवर गॅस ठेवावा. (काढायचे बूड पातळ असेल तर बारीक गॅस)
१२. साधारण ५-७ मिनिटांनी झाकण काढून कुकीजचा ट्रे बाहेर काढावा. आणि अर्धवट भाजल्या गेलेल्या कुकीज काटेचमच्याने जरा दाबाव्यात. म्हणजे कुकीज भाजल्यानंतर चपट्या राहतात. नाही तर मध्यभागात फुगून वर येतात.
१३. पुन्हा कुकीज भाजायला ठेवून द्याव्यात. (गॅस - बारीक किंवा मध्यम)
१४. साधारण अजून ७-१० मिनिटात कुकीज भाजून तयार होतात. कुकीज भाजून झाल्यावर त्यांचा रंग किंचित ब्राऊन होतो.
१५. गॅस बंद करून ट्रे बाहेर काढा आणि थंड होऊ द्या.
१६. आता चॉकोलेट चिप कुकीज तयार आहेत.    


टिप:
१. कप, चमचे हे measuring कप आणि चमचे आहेत.
२. ओट्स किंवा पोहे घातल्याने किंचित कुरकुरीतपणा येतो.
३. एका वेळेस जास्त कुकीज बेक करायच्या असतील तर इडलीचा स्टॅन्ड वापरू शकतो. पण मग जास्त लक्ष द्यावे लागते. कारण खालच्या ताटल्यांना जास्त उष्णता मिळते आणि वरच्या ताटल्यांना कमी. त्यामुळे लक्ष ठेवून बेक केल्यास उत्तम.   

Source: Internet

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा