केशर मलई कुल्फी
साहित्य:
दूध १/२ लीटर
साखर १/२ वाटी
मिल्क पावडर ४ चहाचे चमचे
साय २-३ चमचे
१० - १२ केशराच्या काड्या
कृती:
१. एका कढईत दूध तापवायला ठेवावे.
२. दुधाला उकळी आल्यावर १० मिनीटे उकळू द्यावे.
३. आता ह्या दुधात साखर घालून पळीने ढवळावे.
४. साखर विरघळल्यावर त्यात मिल्क पावडर घालावी. पळीने व्यवस्थित ढवळावे म्हणजे दुधाची पावडर नीट एकजीव होईल.
५. केशराच्या काड्या दुधात (साधारण १/४ वाटी दूध) मिसळून ते दूध उकळत्या दुधात घालावे.
६.आता ह्यात साय घालून २ मिनीटे उकळू द्यावे.
७. गॅस बंद करून हे दूध गार करायला ठेवावे.
८. दूध गार झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. म्हणजे सायीचे तुकडे एकजीव होतील.
९. आता हे दूध कुल्फीचे मोल्ड असतील तर त्यात किंवा कुल्हड़ असतील तर त्यात किंवा हवाबंद डब्यात घालून फ्रीजरमधे ठेवावे.
१०. ५-६ तासात कुल्फी तयार.
टीप:
१. कुल्हड़ मध्ये घालून कुल्फी करायला ठेवल्यास अॅल्युमिनियम फॉईल वापरून घट्ट बंद करावे.
२. आवडत असल्यास बदाम आणि पिस्त्याचे काप देखील घालू शकता.
३. ह्या प्रमाणात ४ माणसे मनसोक्त कुल्फी खाऊ शकतात.
Comments
Post a Comment