एक नवे पाऊल
हा ब्लॉग सुरु केला तेव्हा अनामिक राहून व्यक्त व्हायला ठिकाण हवे होते. मला वाटतं, जमेल तसं व्यक्त होता आले पाहिजे असं वाटत होतं. पण तेव्हा तेही पूर्णपणे जमले नाही. सारखी मनात भीती असायची की कोणी चुकूनमाकून ओळखले तर!
ब्लॉग सुरु केल्यापासून एवढ्या वर्षांनी त्या अनामिकतेच्या पडद्याबाहेर यावेसे वाटत आहे. कोण काय म्हणेल ह्याचे ओझे बाजूला ठेवता येत आहे.
त्यामुळे माझ्या YouTube वरील व्हिडिओचे दुवे इथे देत जाणार आहे. मनस्विता ह्या नावामागील खरे नाव आणि खरा चेहरा समोर येणार आहे.
Comments
Post a Comment