अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून माझी मोठी मुलगी आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते. आम्ही दोघी वेगवेगळ्या भागात पुस्तके पाहत होतो. तेवढ्यात तिथल्या तिथेच मला माझ्या मुलीचा फोन आला. ती जिथे होती तिथे ती मला बोलावत होती. झालं असं की ती तिथे पुस्तकं पाहत असताना, तिथे आलेल्या इतर काही जणी चित्कारल्या 'ई.. हे बघ Mills & Boon!' आणि माझ्या मुलीला तिथे Mills & Boon च्या पुस्तकांचा ढीग दिसला. तो पाहताच तिने मला लगोलग फोन केला. मी तिथे गेले आणि अत्यानंदाने दोन पुस्तके घेऊनच टाकली. काहींना Mills & Boon हे प्रकरण काय आहे हे माहीत नसेल म्हणून सांगते. रोमँटिक कथांची ही पुस्तके असतात. दर पुस्तक वेगळ्या लेखिकेचं ...
नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खरं तर हे इतकं खाजगी असं चव्हाट्यावर मांडायची खरंच काय गरज! इथे लिहिण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर असं म्हणतात की "More you write personal, more it becomes universal". तसेच बाबा गेल्यावर मोठ्याने भोकाड पसरून रडावसं वाटत होतं. पण तेव्हाच्या एकूण परिस्थितीत ते जमलंच नाही. इथे मला वैयक्तिकरित्या ओळखणारे फार कमी असतील. त्यामुळे कोण काय म्हणेल ही भीती पण कमीच. १५ मार्च हा त्यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्त त्यांना माझ्याकडून ही आदरांजली. ============================= माझे बाबा आमच्या घरातलं मी चौथं आणि शेवटचं अपत्य. माझ्या जन्मानंतर बाबा ज्या उत्साहाने दवाखान्यात भेटायला यायचे ते पाहून...
रात्रीची जेवणंखाणं उरकून गावातली तमाम मंडळी त्यांच्या नेहमीच्या पारावर येऊन गप्पा मारत बसली होती. आदल्याच दिवशी झालेल्या अमावास्येमुळे विषय अर्थातच भुताखेतांवर न गेला, तरंच नवल होतं. अज्याने त्याच्या मामाने पाहिलेल्या भुताचा काहीतरी एक किस्सा सांगितला, तर सच्याने त्याच्या आजीची गोष्ट सांगितली. तिला एका अमावास्येच्या रात्री विहिरीत उडी टाकून गेलेली त्यांच्या गावची पाटलीण दिसली होती. असं प्रत्येकाचं काही ना काही सांगून झालं होतं. त्यामुळे गप्पांचा जोर कमी होत आला होता. तसं राजूचं लक्ष पाराच्या पलीकडे एका दगडावर बसलेल्या माणसाकडे गेलं. गडी गावचा नाही, हे सहज लक्षात येत होतं. “काय पाव्हणं, कोणाकडे आला?” असं म्हणत राजूने त्याची चौकशी सुरू केली. तशा सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. “मागच्या आळीतल्या वसंताकडे आलोय’ असं त्याने उत्तर दिलं. “मग नाव काय म्हणालात? अन कुठल्या गावचे म्हणायचे तुम्ही?” वसंताचा पाहुणा म्हटला, तशा राजूच्या पुढच्या चौकश्या सुरू झाल्या. “मी मुकुंद. आजच पुण्याहून आलो. वसंता गेलाय शेतावर पाणी द्यायला. घरी बसून काय करायचं, म्हणून थोडं पाय मोकळे करायला बाहेर पडलो.” पाहुण्...
Comments
Post a Comment