Posts

हिरव्या रंगाचा चष्मा

ही गोष्ट एकदा शाळेत असताना एका मैत्रिणीने सांगितली होती. त्या मैत्रिणीशी काहीच संपर्क राहिला नाही. पण ह्या गोष्टीच्या रूपाने तिची आठवण मात्र मनावर कोरली गेली. ========================================================= एक आटपाट नगर होतं. त्या नगराच्या राजाला एक सुकुमार मुलगा होता. परंतु अत्यंत गुणी अश्या ह्या राजपुत्राला अचानक एका विचित्र आजाराने पछाडते. त्या राजपुत्राच्या दृष्टीस जर हिरव्या रंगा व्यतिरिक्त जर कुठला दुसरा रंग पडला तर तो सडकून आजारी पडत असतो. झालं! आपल्या पुत्रप्रेमापोटी तो राजा फतवा काढतो की राज्यात सर्वत्र हिरवाच रंग दिसेल अश्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे पूर्ण राजवाड्यात हिरव्या रंगाचे साम्राज्य पसरते. अवती-भवती सर्वत्र केवळ हिरवाई. जमीन असेल तिथे हिरवे गालिचे आच्छादलेले असतात. पण राजा हा केवळ एक माणूसच असल्याने पूर्ण जगात तो हिरवाई आणूच शकत नव्हता. आकाशाचा निळा रंग तो झाकू शकत नव्हता.  पुन्हा राजा चिंताग्रस्त झाला. काय करावं सुचेना. तेवढ्यात त्याच्या राज्यात एक साधू-पुरुष हिंडत फिरत आले. त्यांना सर्वत्र दिसणार्या हिरव्या रंगाचे गूढ कळेन...

हत्ती आणि दोरी

ही गोष्ट मला बर्याच दिवसांपूर्वी एका ईमेल मध्ये आली होती. मनाला खूप भावली म्हणून इथे देत आहे. ======================================================================= एके दिवशी एक माणूस एका गावात चक्कर मारत असतो. तर त्याला तिथे एक विलक्षण दृश्य दिसतं. एक भला-मोठ्ठा हत्ती एका खांबापाशी उभा असतो. आणि थोडं जवळ जाऊन पाहता त्याला असं दिसतं की त्या हत्तीच्या पायाला एक दोरी बांधली आहे आणि तिचं दुसरं टोक त्या खांबाला बांधलेलं आहे.  त्या माणसाला प्रचंड आश्चर्य वाटतं की एवढा अजस्त्र हत्ती ती सुतळी तोडून तिथून सुटायचा प्रयत्न न करता तिथेच बंधकासारखा उभा आहे.   तो माणूस त्या हत्तीच्या मालकाला शोधतो आणि त्याला विचारतो की एवढा मोठा हत्ती केवळ पायाला बांधलेल्या दोरीने कसा काय एके जागी बदला गेला आहे? तेव्हा तो मालक सांगतो की तो हत्ती जेव्हा एक लहान पिल्लू होता तेव्हाच त्याच्या पायाला अशी दोरी बांधलेली. त्यावेळेस त्याने ती दोरी तोडून सुटायचा प्रयत्न केला पण त्याची शक्ती कमी पडल्याने सुटू शकला नाही.  आता त्या हत्तीच्या मनात ती दोरी न तुटण्याची भावना ठाम झालेली असल्याने त...

कोरडे पाषाण

माझी मोठी मुलगी जरा चिडखोर आहे. म्हणजे ती तिच्यासमोर घडलेली, बोललेली प्रत्येक गोष्ट मनावर घेते. आणि मग चिडणे, रडणे, रुसून बसणे चालू होते. आणि मग अश्या प्रसंगी कायम तिची समजूत काढावी लागते.  अश्या वेळेस मी तिला कायम सांगत असते की समोरची व्यक्ती काय बोलते किंवा कशी वागते हे आपल्या हातात अजिबात नसते. पण आपण ह्या सर्वांना काय प्रतिक्रिया द्यायची हे नक्कीच आपल्या हातात असते. (मला वाटतंय की बहुतेक सगळ्यांना ती एक मेल नक्कीच आली असेल की आपल्याला होणारं सुख किंवा दुःख ह्यासाठी सभोवतीची परिस्थिती केवळ १०% कारणीभूत असते आणि उरलेले ९०% आपण परीस्थितीला काय प्रतिक्रिया देतो हे!) पण काय आहे न की अजून ती लहान आहे त्यामुळे मी सारखं सांगत राहते आणि ती पुढच्या वेळेस तिला जसं वागायचं तसं वागत राहते. असो. तर आज ह्या गोष्टीची आठवण यायचा कारण म्हणजे. सकाळी अशीच एक घटना घडली. कोणी तरी काही तरी बोललेले मला कळले आणि मला खूप दुःख झालं. गंमत कशी आहे ना की कोणी तरी काही तरी कधी तरी बोलून गेलंय जे मला आज कळलंय. म्हणजे माझा अजिबातच कंट्रोल नाही. तरी मी वाईट वाटून घेत बसले. आता मग ह्याला काय म्ह...

Rosy picture

Image
मी माझी जुनी कंपनी सोडली आणि नवीन जागी रुजू झाले. आता त्याला सुद्धा जवळ-जवळ एक महिना होत आला. पण आधीच्या ठिकाणी मी साडेसहा वर्षे होते त्यामुळे खूप जास्त गुंतले होते.  आता जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिथला अनुभव एखाद्या 'Rosy picture' सारखा वाटतो. केवळ चांगल्या आठवणीच दिसतात. म्हणून हे शीर्षक. (मी विचार करत होते की आपला ब्लॉग मराठी आणि शीर्षक मात्र इंग्रजी देणं कितपत योग्य! पण मग मला चांगला मराठी प्रतिशब्द सुचला नाही. मग विचार केला की भाषा ही मनातल्या भावना दुसर्यापर्यंत पोहोचवायचं माध्यम. त्यामुळे उद्दिष्ट महत्वाचं आणि माध्यम दुय्यम.) असो. पुन्हा विचार करत होते की तिथल्या आठवणी म्हणजे चांगल्या आणि वाईट अनुभवांचं मिश्रण. म्हणजे  'Rosy picture' मध्ये काटे पण असतात पण दिसत नाहीत. माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालंय. फक्त चांगल्या आठवणींचा गंध येतो आणि काटे काही सलत नाहीयेत. टीप: प्रकाशचित्र इंटरनेटवरून साभार.

सर्दीसाठी एक घरगुती उपाय

सर्दी हा माझ्या घरचा रेसिडेंट आजार आहे. वर्षभरातून घरात कोण न कोणाला सर्दी असतेच. त्यात मला आणि माझ्या मोठ्या मुलीला अशी सर्दी होते की जी बाहेर वाहती नसते. त्यामुळे डोकं किंवा कान ठणकणे असे प्रकार होत असतात.   अलीकडे अलीकडे मी कानात एक तेल घालण्याचा उपाय चालू केला आहे. त्यामुळे माझे आणि माझ्या मुलीचे डोके दुखणे आणि कान ठणकणे हमखास बंद होते.   १ चमचा तिळाचे तेल घेऊन कढईमध्ये गरम करायला ठेवायचे. त्यात साधारण ३-४ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. लसून साधारणपणे काळसर होईल  इतपत त्या तेलात तळायचा. हे तेल थंड होवू द्यायचे. रात्री झोपताना थंड झालेले तेल कानात प्रत्येकी साधारण २ थेंब घालावा आणि कापसाचा बोळा घालून झोपावे. सकाळपर्यंत बर्यापैकी फरक जाणवतो. (मुख्यत्वे तिळाचे तेल वापरावे कारण ते उष्ण असते. त्याबरोबरीने लसूणही उष्ण असल्याने सर्दीवर उपचार म्हणून फायदा होतो.)   आमचे फॅमिली डॉक्टर कायम हा उपाय सांगायचे पण आधी कधी अमलात आणला...

माझ्या कन्येचा ब्लॉग

माझ्या कन्येचा ब्लॉग चालू केला आहे. केवळ माझा आळशीपणा म्हणून त्यावर काही पोस्ट केले नव्हते. पण आज तिने काढलेले एक चित्र तिच्या ब्लॉगवर पोस्ट करत आहे. तिच्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे. तुम्ही अवश्य तिच्या ब्लॉगला भेट द्या. http://a-fragrant-jasmine.blogspot.com/

Sunday Syndrome

२-३ वर्षांपूर्वी 'Sunday' नावाचा एक हिंदी सिनेमा येऊन गेला. आयेशा टाकिया, अजय देवगण, अर्शद वारसी असे कलाकार होते. मी तो पिक्चर टीव्हीवरंच बघितला होता. मला खूप आवडला. कदाचित तो नेहमीप्रमाणे एखाद्या इंग्लिश पिक्चरची कॉपी असेलसुद्धा. पण म्हणतात न की अज्ञानात सुख असतं. तसंच मी फारसे इंग्लिश पिक्चर बघत नसल्याने मला काही कळलं नाही की तो पिक्चर ओरिजिनल आहे कि कॉपी. पण मनाला आनंद देऊन गेला हे निश्चित.   तर आज ह्या पिक्चरची आठवण व्हायचं कारण म्हणजे त्या पिक्चरमध्ये जसं आयेशा टाकियाच्या आयुष्यातला फक्त एक रविवार पुसला जातो त्याप्रमाणे माझ्या ऑफिसच्या आयुष्यातले काही महिने पुसले गेले. अर्थात तिच्या आयुष्यातून एक रविवार पुसला जाण्याचं कारण वेगळं होतं आणि माझ्या आयुष्यातले काही महिने पुसले जाण्याचं कारण वेगळं होतं. तर सध्या मी एकदम नॉस्टॅल्जिक मूडमध्ये असल्याने अश्याच अधूनमध...