Posts

मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

नमस्कार! सर्वांना संक्रांतीच्या अनेकानेक गोड शुभेच्छा! तिळगुळाची गोडी आपणा सर्वांच्या आयुष्यात सदैव राहो ही मनोकामना.  तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.... :) **************************************

I love you

काल आदित्यने त्याच्या वर्गातल्या आर्याला 'I love you ' म्हणलं. मग  ती त्याला म्हणाली की माझं तुझ्याशी प्रेम आहे. आणि ते हे एकमेकांशी उभं  राहून बोलत असताना अदितीने ऐकलं  आणि सगळ्यांना सांगितलं. आणि मग  सगळे खूप हसले.   तुम्हाला काय वाटतं. हा किस्सा काय वयाच्या मुलांचा असेल?  . . . मला वाटतंय की माझ्या काळातला असला असता तर साधारण किमान वय १२-१३ तरी असले असते. अलीकडे ते हळू हळू खाली येत आहे. पण हा किस्सा माझ्या धाकट्या कन्येच्या वर्गात घडला. वय किती तर फक्त वर्षे ५!!! आज सकाळी मी काम करत असताना तिने मला सांगितलं  की तिच्या वर्गात काल एक गंमत  झाली आणि तिने वर दिलेली घटना सांगितली. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.  त्याला कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेचना.  भविष्यात काय काय प्रकारचे प्रसंग येणार आहेत याची ही मला नांदी वाटली. प्रश्न उरतो की असे प्रसंग हाताळायचे कसे. आहे काही उत्तर तुमच्याकडे?

शिक्षक दिन विशेष - देसाई सर

मी सहावीत असताना पुण्यात आले. आमची शाळा मुला-मुलींची असली तरी सकाळची शिफ्ट मुलींची आणि दुपारची मुलांची असं होतं. त्याप्रमाणे लागणारा शिक्षक वर्ग पण असायचा. सकाळी शिक्षिका जास्त. तर दुपारी मुलांना हाताळू शकतील असेल शिक्षक जास्त. असो. मग सातवीत गेल्यावर आमचा मुला-मुलींचा एकत्र असा वर्ग झाला. तथाकथित हुशार मुलांची तुकडी. आणि शाळा झाली दुपारची. तेव्हा आम्हाला पीटीला देसाई सर म्हणून आले. ते नक्कीच साचेबद्ध शिक्षकापेक्षा वेगळे होते. पीटीचे सर असल्याने कडक तर होतेच पण त्या बरोबर मुलांमध्ये मिसळून जायची कला त्यांच्याकडे पण होती. त्यांचं वाचन भरपूर होतं. आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांनी केलेलं वाचन अथवा त्यांनी बघितलेला पिक्चर गोष्टी रुपात आमच्या पर्यंत पोहोचवता यायचं. मला अजून आठवतंय त्यांनी 'शर्थीने राज्य राखले' ह्या कादंबरीतले काही भाग आम्हाला सांगितले होते. खूप भारावून गेल्यासारखं झालं होतं. त्याच बरोबर त्यांनी आम्हाला 'फ्रॅन्केनस्टाईन' ह्या पिक्चरची गोष्ट सांगितली होती. आज विकी वर पाहिलं तर १९३१ सालचा तो पिक्चर आहे. त्यांनी तो कधी बघितला असावा काय माहित! पण त...

सुविचार

आज SMS मध्ये एक छान सुविचार आला. आवडला म्हणून इथे टाकत आहे. "Meditation purifies Mind  Charity purifies Wealth   Fast purifies Body  Forgiveness purifies Relation  But only Prayer purifies Soul."

पास्ता इन टोमॅटो सॉस

Image
ही रेसिपी मी एका साप्ताहिक सकाळच्या अंकात वाचली आहे. उषा पुरोहितांची आहे. पण खालील रेसिपी माझे काही फेरफार करून केलेली आहे. मुख्य म्हणजे त्यांनी ओव्हन मध्ये बेक करायला सांगितले आहे. पण माझ्या कडे मायक्रोवेव्ह नसल्याने मी बेक केले नाहीये. असो.  सर्वात आधी मी माझ्या घरच्यांवर हा प्रयोग केला. आणि मग यशस्वी झाल्यावर परवा माझ्या मोठ्या लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीला मोठ्या प्रमाणावर केला. सगळ्यांना खूप आवडला. त्यामुळे इथे त्याची कृती टाकत आहे. साहित्य: पास्ता               २०० ग्रॅम टोमॅटो               ५०० ग्रॅम  कांदा                 १  लसूण                 ४-५ पाकळ्या  गाजर                  १  मीर पूड                चवीनुसार  ऑलिव तेल          २ चमचे बटर     ...

अर्धशतक

अरेच्चा, बघता बघता अर्धशतक गाठलं. आत्ताची ही ५१ वी पोस्ट. सुरुवात केली तेव्हा किती लिहायचं, काय लिहायचं हे काहीच ठरवलं नव्हतं. फक्त लिहायचं एवढंच मनात होतं. त्यामुळे हे अर्धशतक गाठायला किती वेळ घेतला हे खरंच महत्वाचं नाहीये. सध्या तरी लिखाण चालू राहिलेय हीच मला महत्वाची गोष्ट वाटतेय.  मी जेव्हा नुकतीच कार चालवायला शिकले होते तेव्हा वेगाचं भारी वेड होतं. (म्हणजे तसं ते पूर्णपणे गेलं नाहीये तरीही!) त्या वेगाच्या पायी इच्छित स्थळाला लवकर पोहोचत तर होते पण कित्येक क्षण काळजाचा ठोका चुकवणारे अनुभवाला यायचे. आता मात्र गाडी चालवताना प्रवास निर्धोक आणि आनंददायी होईल हे बघते.  त्यामुळे ब्लॉगिंग मध्ये  अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अजून खूप लिहायचं आहे. मन-मोकळेपणाने लिहायचे आहे. पण हा प्रवास सुसाट नसेल कदाचित पण मनाला आनंद देणारा नक्कीच असेल.

एका बेडकाची गोष्ट

माझी आधीची कंपनी सर्व्हिस बेस्ड कंपनी असल्याने बिहेवियरल ट्रेनिंग बरीच असायची. असंच एक ट्रेनिंग केलं होतं त्यात आमच्या ट्रेनरने ही बेडकाची गोष्ट सांगितली होती. मनात कायमच्या राहिलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. ===================================================================== एकदा काही संशोधक एका बेडकावर  प्रयोग  करत होते. प्रयोग असा होता की बेडूक किती तापमानाचे गरम पाणी सहन करू शकतो. सर्व प्रथम त्यांनी पाण्याचं तापमान ९० अंश ठेवलं. म्हणजे पाणी उकळायला लागाच्या आधीचं तापमान. त्यांनी बेडकाला त्या पाण्यात टाकलं तसं त्याने टुणकन बाहेर उडी मारली. मग संशोधकांना वाटलं की हे तापमान खूप जास्त होत आहे म्हणून त्यांनी पाण्याचं तापमान बरंच कमी केलं आणि ५० अंश ठेवलं. पुन्हा बेडकाला त्यात टाकलं तर त्याने पुन्हा पाण्याबाहेर उडी मारली. पाण्याचं तापमान अजून कमी केलं. ४० अंश ठेवलं. पण ते तापमान पण बेडकाला सहन झालं नाही आणि त्याने बाहेर उडी मारली. मग संशोधकांनी विचार केला की बेडकाला पाण्यातच ठेवायचे आणि हळू-हळू पाण्याचे तापमान वाढवायचे. म्हणजे त्यांना नक्की कळेल की कुठल्या ...