२६/११
कालंच २६ नोव्हेंबरला जो दहशतवादी हल्ला झाला त्याला २ वर्षे पूर्ण झाली. टीवी वरच्या विविध वाहिन्या, वर्तमानपत्रे आणि रेडियोवरसुद्धा त्याचीच चर्चा होती. काल घरी येताना रेडियो मिर्चीवर एक जाहिरात/आवाहन पण ऐकलं की तुम्ही सतर्क रहा आणि २६/११ सारख्या घटना टाला. मग सहजंच मनात विचार आला की मुंबईमधे लोकल मधेसुद्धा bomb स्फोट घडवून आणले ती घटना कधी झाली. मला तरी तारीख आठवत नाही. मग वाटलं की आपण एवढे निरढावलेले आहोत का की अश्या घटना आपण सहज-सहजी विसरत आहोत. पण मग लक्षात आलं की २६/११ ची घटना आपण विसरत नाही आहोत. असं का? ह्या प्रश्नावर विचार करता करता लक्षात आलं की प्रसारमाध्यमे आपल्याला हे अजिबात विसरु देत नाहीयेत. लोकलमधे जे स्फोट घडवून आणले त्यात तर २०० च्या वर माणसे मृत्युमुखी पडली आणि शेकडो माणसे...