Speed thrills but...
- Get link
- X
- Other Apps
प्रसंग १: साधारण ७-८ महिन्यांपूर्वी स्थळ: बाणेर रोड वेळ: साधारणतः ६:३० - ६:४५
James Bond ला जसे license to kill मिळालेले असते तसे बाणेर रोड वर गाडी चालवणारे सर्व जणांना license to drive fast मिळाल्यासारखे वागत असतात. तर अर्थातच मला पण हे असे license मिळाले आहे अश्या थाटात मी पण गाडी चालवत असते. टू-व्हीलर वर एकदा एक छोटा एक्सिडेंट झाला आहे तरी वेगाचं वेड काही कमी होत नाही.
त्या दिवशी तर नवर्याची गाडी असल्याने तर सूसाट चालले होते. (असं वाटतं की जर १४०० cc ची गाडी चालवायची तर सावकाश चालवून तिला न्याय कसा मिळणार! ) University chya सिग्नलला पोहोचायच्या थोडं आधी मी एका गाडीला असच कट मारला आणि पुढे गेले. आणि त्या वेळेस डोक्यात विचार आला की आपण एवढे वेगात गाडी चालवत आहोत आणि काही अपघात झाला तर...
माझा स्वतःचा काही बरं वाईट झाला तर निदान माझ्या स्वतःपुरता तरी प्रश्न मिटलेला असेल. पण त्या व्यतिरिक्त माझ्या हातून काही घडला तर! आणि ह्या विचाराने मी प्रचंड हादरले. आणि जरा सावकाश गाडी चालवायला लागले.
प्रसंग २: तीच संध्याकाळ स्थळ: माझे घर आणि त्या समोरचा रस्ता वेळ: साधारणतः ७:३० - ७:४५
ऑफिस मधून आम्ही घरी पोहोचलो होतो. माझ्या घरा समोरचा रस्ता १०० फूटी आहे. अत्यंत गुळगुलीत आहे. आणि त्या वेळेस रोड divider सुद्धा नसल्याने तो जणू रन-वे सारखा वाटायचा. मग तर काय लोकांना वाटायचं (किंवा अजूनही वाटतं!) की त्यांना fast किंवा rash driving करण्याचा अधिकार आहे. तर तसे लहान-सहान अपघात होतंच होते. पण मोठ्ठा अपघात अजून कधी झाला नव्हता.
नुकतेच आम्ही हात-पाय धुवून खोलीत बसलो होतो. (आमची खोली road facing आहे.) आणि एका कारचा करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. आणि त्या पाठोपाठ एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. बहुतेक तो मुलगा त्या अपघातात जखमी झाला होता. अगदी घरा समोर एक्सिडेंट झाला होता पण मधे एक झाड असल्याने काही दिसत नव्हते. पण बरीच लोकं तिकडे धावताना दिसते होती.
नंतर कळलेल्या वृत्तान्ता नुसार एक लहान मुलगा रस्ता ओलांडत होता. एक होंडा सिटी अत्यंत वेगात आली आणि कारच्या ड्राईवरने त्या मुलाला पाहून ब्रेक दाबायचा प्रयत्न केला पण... पण त्या गाडीने त्या लहान मुलाला उडवले होते. आणि त्या गाडीचा ब्रेक इतका जोरात लागला होता की गाडी पूर्ण विरुद्ध दिशेला वळली होती. आणि तो ड्राईवर तिकडून पलुन गेला होता.
तो लहान मुलगा (वय वर्षे ८) काही तासांनी मृत्युमुखी पडला होता... :( आणि पोलिसांनी त्या ड्राईवरला पकडले होते. २१ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांची नविन गाडी चालवत होता तो पकडला गेला होता. २१ वर्षे वय म्हणजे अजून नुकतीच आयुष्याची सुरुवात होती. आणि अशी ही तारुण्याच्या मस्ती मधे केलेली चूक कदाचित आयुष्य भराची किम्मत मोजायला लावणार होती.
ह्या सर्व प्रकाराची मी एक साक्षीदार होते. ज्या गोष्टीची केवळ एका तासा पूर्वी नुसत्या कल्पनेने भीती वाटली होती ती गोष्ट प्रत्यक्ष घडताना मी पाहिली होती. नख-शिखान्त हादरले होते. रस्त्या वर बर्याचदा "Speed thrills but it kills" हे घोषवाक्य वाचला होतं. पण त्याचा नक्की काय अर्थ होतो ह्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जसं आधी सांगितलं तसं वेगात गाडी चालवणे हा मूळ स्वभाव असल्याने अजूनही फास्ट गाडी चालवण्याचा मोह होतो. पण रस्त्यावर ते घोषवाक्य दिसतं आणि तो अपघाताचा प्रसंग आठवतो आणि accelerator वरचा पाय आपोआप बाजूला होतो...

Comments
Post a Comment