काही तरी...
- Get link
- X
- Other Apps
बरेच दिवस झाले काहीच नविन पोस्ट केला नाही. कित्ती गोष्टी ठरवल्या होत्या लिहायच्या म्हणून. पण सगळे राहूनच गेले. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, मी केलेल्या पदार्थांबद्दल लिहायचे होते पण राहूनच गेले. उत्साहाने ओतप्रोत भरलेली दिवाळी आली आणि भरपूर आनंद देऊन गेली.
एखादा कार्यक्रम आपण जर ठरवला असेल तर कसं आपण पूर्ण झोकुन देऊन काम करतो. आणि तो कार्यक्रम संपला की कसे रितेपण येते तसे आत्ता झाले आहे. एकदम रिकामं-रिकामं वाटत आहे. आता काय करू असे झाले आहे.
मग लक्षात आले की अरे, आपला ब्लॉग आहे ना... कित्येक दिवसात आपण काहीच लिहिला नाही. म्हणून मग आज म्हणला की काही तरी लिहावं. पण अर्थात काय लिहावं हे निश्चित नसल्याने काय शीर्षक द्यावे हाही एक मोठा प्रश्न होता. म्हणून काही तरी लिहायचा विचार करून लिहायला घेतल्याने 'काही तरी' असे शीर्षक देऊन टाकले. म्हणजे मग नावातंच एक disclaimer टाकल्याने नक्की काय लिहायचे ह्याचे बंधन नाही. आणि काय लिहिल ते फार अर्थ पूर्ण असायला पाहिजे असंही नाही. (कसली हुशार आहे ना मी... :P)
आता सुरुवात केल्यावर मात्र वाटतं की असं कसं... काही तरी असं नाव जरी दिला असलं तरी इतकं पण दिशाहीन कसं लिहावं...
लहान असताना आईच्या मागे भूक लागली की काय कटकट चालू करायची की मला भूक लागली काही तरी दे ना... आई म्हणायची की नक्की काय हवे ते सांग. कारण काही तरी नावाचा पदार्थ तिला माहीत नाही... पण बहुतेक त्या वेळेस पण तो एक प्रकारचा disclaimer असावा. की आईने काही खायला दिले तर त्याला नाकरन्याचे आपल्याला स्वातंत्र्य असावा. नावडता पदार्थ आला तर मला काही तरी मधे हे अपेक्षितच नव्हते म्हणण्याचा पर्याय हाती असावा असे वाटत असावे कदाचित. असो. तर 'काही तरी' ह्या नावाप्रमाणे काही तरी विषयांतर केले. (अर्थात हे स्वातंत्र्य आहेच त्या disclaimer ने).
पण आता काही तरी लिहायचं म्हणून किती भरकतावे ह्या काही मर्यादा! आणि दिशाहीन होडी चालवल्याने कुठल्यातरी किनारी कसे पोहोचायचे हाही प्रश्नच निर्माण करून ठेवला. मग सोडून देऊ का ही नाव अशीच वाटेत?
अश्या बेवारस नावा जेव्हा आपण खूप दिवसांनी बघतो तेव्हा फार केविलवाण्या दिसतात नाही! कदाचित काही दिवसांनी माझी ही पोस्ट पण फार केविलवाणी दिसेल. दिसली तर दिसू देत. आत्ता तरी ह्या पोस्टने मला बरच ताजं-तवाने झाल्या सारखे वाटत आहे. बघूयात नंतरचे नंतर...

Comments
Post a Comment