MP3
परवा   सहजच   माझ्या   ऑफीस   मधल्या   सहकार्याला   माझा   ब्लॉग   दाखवत  होते .  खरं  तर  तो  तेलुगु   त्यामुळे   माझा  मराठीतला   ब्लॉग  त्याला  काही  कळणार   नव्हता .  पण   तरीही ... मग  तो  मला  विचारत  होता  की  कशाबद्दल  लिहितेस ? Audio coding? मी  म्हणाला  की  टेक्निकल   काहीही   नाही   फक्त   अवांतर .   मग  मी  विचार  करू  लागले  की  एखाद  दुसरी   टेक्निकल  विषयावरची  पोस्ट  लिहायला  काही  हरकत  नाही . आणि  ज्या  तांत्रिक  विषयाबद्दल  मी  लिहू  शकते  तो  फार  वेगळा , समजायला  अवघड  असा  काही  नाही . कारण  आपण  ती  टेक्नोलॉजी  दैनंदिन  जीवनात  वापरतो . त्यामुळे  आजची  पोस्ट  mp3 के  नाम !  गाण्याच्या  mp3 फाईल्स  आपण  आजकाल  किती  सर्रास  वापरतो  नाही . डिजिटल  audio players न  आपण  सहजच  mp3 players  म्हणून  टाकतो . मला  आठवतंय  मी  कॉलेज   मध्ये  असताना  म्हणजे  साधारण  ९८ - ९९   साली  माझी  एक  मैत्रीण  एका  सीडी  मध्ये  शेकडो  गाणी  घेऊन  आली  होती...