कौन बनेगा करोडपती - अंतिम भाग
- Get link
- X
- Other Apps
आज कौन बनेगा करोडपतीचा शेवटचा भाग झाला. आजकाल कुठलाही कार्यक्रम फक्त ९ आठवड्यांच्या कालावधीत संपणे हे एक आश्चर्यच आहे.
ई TV मराठीवर या गोजिरवाण्या घरात हि सिरीयल जवळ जवळ आठ वर्षे चालू आहे. माझ्या मोठ्या मुलीच्या जन्म आधीपासून. तिच्या कळत्या वयापासून तिला वर्षानुवर्षे चालणारे कार्यक्रम पहायची सवय झाली आहे. त्यामुळे तिला हा कार्यक्रम इतक्या लवकर संपतो हि फारंच तिच्या शब्दात सांगायचं तर एक अनोखी गोष्ट आहे. (बोलीभाषेत हिंदी शब्दांचा वापर हे हिंदी कार्टून बघण्याचे परिणाम आहेत.)
त्यामुळे ह्या कार्यक्रमाबद्दल असलेली टीका कि हा एक reality show आहे, काही उत्तरांसाठी एवढे पैसे असली तरी अमिताभ बच्चनची मी die-hard fan असल्याने हा कार्यक्रम संपला ह्याची मनाला जरा हुरहुर लागली आहे. .
सूत्रसंचालन करताना हा माणूस कोणी इतरांनी लिहिलेले डायलॉग न म्हणता तो उत्स्फूर्तपणे बोलत आहे असे वाटते. आजचा समारोपाचा डायलॉग पण तसाच होता. जणू तो स्वतःचं मनोगत व्यक्त करत आहे असे वाटत होते.
अजून थोडे दिवस हा कार्यक्रम चालवा असे वाटत असताना हा कार्यक्रम संपणे हे त्याचे एक प्रकारचे यश वाटते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment