बदामाचे तेल
खरंतर कागदोपत्री थंडी सुरू होवून एक महिना उलटून गेला. पण निसर्गाने प्रचंड विक्षिप्तपणा करत मधेच पाउस, मधेच प्रचंड उकाडा असे वेगळेच रंग दाखवले. त्यामुळे झाले असे कि जी पोस्ट मी खूप आधी लिहिणार होते ती राहूनंच गेली. पण आता पुण्यात थंडीने भलताच जोर धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर हि पोस्ट लिहायला घेतली आहे.
माझी स्वतःची त्वचा फार कोरडी आहे. त्यात आता थंडी म्हणाल्यावर तर बघायलाच नको. उपाय बरेच असतात. बाजारात मिळणारी विविध क्रीम्स, moisturisers इत्यादी इत्यादी. पण माझ्या अनुभवातला घरगुती आणि प्रभावी उपाय म्हणजे बदामाचे तेल. तसे सर्वांना माहितंच आहे कि बदामात ई विटामिन असते म्हणून. आणि ई विटामिन त्वचेसाठी पोषक असते.
मला स्वतःला दुधात बदाम उगाळून चेहर्याला लावतात हे माहित होते. पण एवढे परिश्रम घ्यायचा कंटाळा. मग ह्याला काही सोप्पा पर्याय मिळतो का विचार केला तेव्हा बदामाचे तेल हे उत्तर मिळाले.
पुण्यात कोथरूडमध्ये (इतर कुठे असेल तर मला कल्पना नाही!) रामकृष्ण oil मिल आहे. तिथे लाकडी घाण्यावर काढलेले तेल मिळते. तिथे विविध प्रकारची तेले मिळतात आणि तिथेच मला बदामाचे तेल मिळाले. खाली त्याचा फोटो देत आहे.
- त्वचेचा कोरडेपणा जातो.
- त्वचा एकसारखी (even) होते.
- चेहरा फेशियल केल्यासारखा उजळतो.
- डोळ्या खालची काळी वर्तुळे कमी होतात.
मी हे तेल उन्हाळा सोडला तर थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात वापरते. सध्याचे थंडीचे दिवस बघता इतरांनी (तेलकट त्वचा असणारे) वापरले तरी फायदेशीर ठरू शकेल.
Comments
Post a Comment