Van!!!
- Get link
- X
- Other Apps
माझी मोठी कन्या सध्या दुसरीत आहे. शाळा तशी जवळच आहे. पण van ने येते जाते. सकाळी सकाळी ७:३० वाजता तिची van येते. तसं जरा लवकरच असल्याने तिच्याच्याने उठणं होत नाही आणि त्यामुळे आवरणं.
तरी नशीबाने आमच्या घरातून बिल्डींगचा गेट आणि रस्ता दिसत असल्याने van जरी आली तरी van च्या काकांना थांबवता येतं. आणि van च्या होर्नचा आवाज अगदी स्वयंपाकघरापर्यंत येतो.
तर असंच एक दिवस कन्या तयार होउन निघायच्या बेतात असताना मला हॉर्नचा आवाज आला. पण जरा van च्या कर्णकर्कश्य पेक्षा थोडा नाजूक वाटला. त्याला खिडकीपाशी जाउन सांगणं आवश्यक होतं कि कन्या खाली उतरतच आहे आणि थांब म्हणून. म्हणून घाईघाईने खिडकीपाशी गेले आणि खाली वाकून van ला नजर शोधू लागली तर van काही दिसेना. तिचे van चे काका एका वेगळ्याच कारपाशी उभे राहिलेले होते.
अजून बारकाईने पाहिले तर ती होंडा सिविक होती आणि त्यात शाळेची मुलं पण होती. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला आणि काकांना विचारलं की कोणाची कार आहे म्हणून! तर ती त्यांच्या भावाची कार होती/आहे. आणि ते पण पांढऱ्या नंबरप्लेटवर काळे नंबर असलेली म्हणजे खाजगी वाहन.
मला माहित होते की त्या van च्या काकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण होंडा सिविक स्वतःची असणे म्हणजे मला फारच गंमत वाटली. :)
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment